जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

इंडियाचे भारत झाल्याने वेबसाईट मध्ये कोणताही होणार नाही बदल ?

1 min read

बीड सम्राट न्युज: केंद्र सरकारच्या वतीने देशाचं India नाव बदलून Bharat केले जाईल. ह्यासाठी संसदेत विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात आले आहे. त्याचबरोबर जी २० डिनरच्या निमंत्रणावर ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे इंडिया नाव बदलून भारत ठेवले जाणार आहे ह्या बातम्यांना दुजोरा मिळत आहे. आपल्या देशाला ” भारत ” असे म्हणतो. हे नाव भरत राजावरून पडले आहे आणि इंडिया इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी इंडस व्हॅली , अर्थात सिंधू खोरे या नावावरूनच भारताचे नाव ” इंडिया ” असे ठेवले भारतीय संविधानात या दोन्ही नावाचा उल्लेख केला गेला आहे. मात्र इंडिया चा भारत असा बदल झाल्यास एक प्रश्न प्रामुख्याने समोर येत आहे की अखेर इंडिया नाव बदलून भारत झाल्यास टेक विश्वावर ह्याचा काय परिमाण होईल?

सध्या सर्व भारतीय वेबसाइटची ओळख India नावावरून होते. जगभरातील जेवढ्या वेबसाइट .In डोमेनवर रजिस्टर्ड आहेत त्यांची ओळख इंडिया नावामुळे आहे. म्हणजे ‘डॉट इन’ ही सर्व भारतीय वेबसाइटची ओळख आहे. त्यामुळे जर इंडिया नाव बदलून भारत झाले तर ह्या वेबसाइटची ओळख बदलू शकते.

​इंडिया विरुद्ध भारत

भारतीय संविधानात भारत आणि इंडिया या दोन्हीं नावाचा वापर करण्यात आला आहे. म्हणूनच सर्व भारतीय देखील इंग्रजीत इंडिया आणि मराठी व हिन्दी भाषेत तसेच इतर भारतीय भाषांमध्ये भारत शब्दाचा वापर करतात. परंतु संविधानात बदल करून इंडियाचे भारत केल्यास इंग्रजीतही भारत म्हणून उल्लेख केला जाईल.

.IN डोमेन म्हणजे काय?

.IN हे एक ccTLD म्हणजे ‘कंट्री कोड टॉप लेयर डोमेन’ आहे. ज्याचा अर्थ असा की शेवटाला .IN असलेल्या वेबसाइट इंडियाशी संबंधित आहेत. ह्यांचे रजिस्ट्रेशन एक भारतीय संस्था NIXI करते. .IN चे काही सबडोमेन आहेत, ज्यात gov.in आणि mil.in चा समावेश आहे. ह्यातील gov चा वापर सरकारी वेबसाइट आणि mil.in चा वापर सैन्याच्या वेबसाइटसाठी केला जातो. अशाचप्रकारे चिनी वेबसाइटसाठी .CN अमेरिकन वेबसाइटसाठी .US डोमेनचा वापर केला जातो.

जर इंडियाचे नाव भारत झाले तर?

.In डोमेन बदलून .BH किंवा .BR किंवा इतर काही तरी होण्याची शक्यता आहे. परंतु हे डोमेन आधीच घेतले गेले आहेत. बेहरीन देशाकडे .BH डोमेन आहे. आणि ब्राझीलचा डोमेन .BR आणि .BT डोमेन भूटानकडे आहे. त्यामुळे भारताला .BHA, .BHRT किंवा .BHARAT डोमेन मिळू शकते.

किंवा डोमेन तसंच राहू शकते?

इंडिया नाव बदलून भारत होईल परंतु त्यामुळे इंडियन वेबसाइटच्या डोमेनवर कोणताही फरक पडणार नाही असे देखील होऊ शकते. कारण चेक रिपब्लिकने आपले नाव २०१६ मध्ये चेक रिपब्लिकवरून चेकिया केले होते परंतु अजून त्यांचे ccTLD‘.CR’ आहे.
नाव बदलून जुना सीसीटीएलडी नवीनवर रिडायरेक्ट केला जाईल. ह्यासाठी वेबसाइटच्या मालकाला डोमेन नेम अपडेट करावे लागेल. जेंव्हा डोमेन बदलते तेंव्हा वेबसाइटचा यूआरएल, ईमेल अ‍ॅड्रेस आणि इतर ओळख बदलतील. ज्यात बराच पैसे खर्च होतो.

नाव बदलल्यामुळे बंद होणार का वेबसाइट?

तर डोमेन नेम बदलल्यावर कोणतीही वेबसाइट बंद होणार नाही. अशा बातम्या निव्वळ अफवा आहेत. ह्याआधी देखील अनेक देशांची नावे बदलली आहेत. अलीकडेच २०२२ मध्ये तुर्कीचे नाव बदलून तुर्किये झाले आहे. तर २०२० मध्ये हॉलँडचे नाव बदलून नेदरलँड झाले आहे . तर १९९३ मध्ये कंपूचियाचे कंबोडिया झाले, बर्माचे नाव १९८९ म्यानमार झाले आणि १९७२ मध्ये सिलोनचे श्रीलंका असे नामांतर करण्यात आले आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.