जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

जपानमध्ये त्सुनामीचा कहर ; जगात सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळ २ फूट उंचीची लहर

1 min read

टोकियो: (वृत्तसंस्था)- जपानमध्ये आलेल्या भिषण भूकंपानंतर समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी धडकली आहे. त्सुनामीच्या लाटांची उंची ०.४ मीटर अर्थात १.३ फुट इतकी उंच आहे. या लाटांची उंची मध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीने शुक्रवारी जपानच्या निगाटा प्रांतात असलेल्या जागातील सर्वात मोठ्या आण्विक ऊर्जा केंद्र काशीवाजाकी-कावीवा जवळ लाटांची उंटी १.३ फुट इतकी नोंदवली आहे. फुकुई प्रीफिक्चर सुरक्षा समितीने आण्विक केंद्राला सध्या तरी कोणताही धोका नसल्याचे म्हंटले आहे. केंद्रावर आणीबाणीची परिस्थिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान दक्षिण कोरिया हवामान संस्थाने दिलेल्या माहितीनुसार त्सुनामीची लाट दक्षिण कोरियाच्या गँगवॉन प्रांतातील मुखोच्या पूर्व किनारपट्टीवर जाऊन पोहोचली आहे. या लाटेची उंची ४५ से.मी. इतकी नोंदवण्यात आली आहे.
जपानमध्ये आलेल्या भूकंपानंतर दक्षिण कोरियाच्या पूर्वेकडील प्रांताने रहिवाशांना स्थलांतर करण्यास सांगितले आहे.दक्षिण कोरियाच्या गँगवॉन प्रांताने सोमवारी रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचा आणि उंच जागेवर जाण्याचा इशारा दिला आहे.

दक्षिण कोरिया पाठोपाठ रशियातील व्लादिवोस्तोक आणि नाखोडका या शहरांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर कोरियाने पूर्व किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला आहे. योनहॅप न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पूर्व किनाऱ्यावर २.०८ मीटर (६.८ फूट) पर्यंतच्या लाटा धडकू शकतात. जपानच्या उत्तरेकडील होक्काइडोपासून ते दक्षिणेकडील क्यूशपर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

इशिकावा प्रांतात भूकंपानंतर सर्वात मोठ्या त्सुनामीचा धोका जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजून ६ मिनिटापासून हा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. इशिकावा आणि निगाटा प्रांतात ४.३ ते ७.६ तीव्रतेच्या भूकंपाचे ९ धक्के बसले आहेत. भूकंपानंतर देशातील अनेक महामार्ग बंद झाले आहेत. तर हजारों घरांची वीज गेली आहे. हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी माहिती केंद्राने दिलेल्या माहितीनुसार जपानमधील मुख्य बेट होन्शूच्याबाजूने, भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर अंतरावरून धोकादायक त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

जपानच्या सरकारी वृत्तवाहिनी एनएचके टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, लाटांची उंची पाच मीटर इतकी असू शकते. किनारपट्टी भागातील लोकांनी तातडीने उंच ठिकाणी किंवा जवळच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर जावे असे ही सांगण्यात आले आहे . जपानच्या पश्चिम किनारपट्टीवर निगाटा आणि अन्य ठिकाणी कमी उंचीच्या त्सुनामी लाटांची नोंद झाली आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.