जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

येत्या ४८ तासांत महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता ; भारतीय हवामान विभाग

1 min read

मुंबई (वृत्तसंस्था)- देशभरात थंडीची लाट वाढत असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

भारतीय हवामान खात्याने पुन्हा देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान आता पाऊस पडल्यास रब्बी हंगामातील गहू, हरबरा, करडी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागानुसार येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि रायलसीमा या काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . तर तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. खासगी हवामान अंदाज एजन्सीने ही हा अंदाज व्यक्त केला आहे.

उत्तर भारतात थंडीचा दणका!

भारत देशातील उत्तर क्षेत्रात असलेलं अनेक राज्य सध्या कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, चंदीगड , दिल्ली आणि राजस्थान मध्ये पुढील दोन दिवस अतिशय थंडी पाहायला मिळणार आहे. तसेच उत्तर पश्चिम भारतातील राज्यात पुढील दोन दिवस भयंकर धुके पाहायला मिळेल. तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर पश्चिमेकडील राज्यात पावसाची दाट शक्यता देखील आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.