जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

प्रजासत्ताक दिनानिमित्त कोण येणार प्रमुख पाहुणे ? आणि येणाऱ्या पाहुण्यांची निवड कशी होते ?

1 min read

बीड सम्राट:

(🇮🇳सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳)

उद्या शुक्रवारी २६ जानेवारी २०२४ रोजी भारत ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्यामुळेच देशात प्रजासत्ताक दिनाची तयारी जोरात सुरु आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस मेहनत घेतल्यानंतर अखेर २६ नोव्हेंबर १९४९ साली आपल्या देशाचं संविधानाला सभेने स्विकारले. त्यानंतर पुढच्या वर्षी २६ जानेवारी १९५० साली आपल्या देशात संविधान लागू झालं. देशात दरवर्षी प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा करण्यात येतो आणि या जल्लोषात जगातील प्रमुख एका नेत्याला आमंत्रित करण्यात येतो . या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन असणार आहे. हा जल्लोष पाहण्यासाठी ते भारतात येणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रजासत्ताक दिना निमित्त परदेशातील प्रमुख नेत्यांना बोलावण्यात येते.
गेल्या वर्षी इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात पोहोचले होते. पण इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्याची निवड कशी होते? हा प्रश्न तुम्हाला कधी नक्कीच पडला असेल. आज याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

प्रमुख पाहुणा म्हणून यावर्षी कोणाला बनवायला हवं, यावरून परराष्ट्र मंत्रालय अनेक गोष्टींवर विचार करतो. यात सगळ्यात आधी भारत आणि त्या देशाच्या संबंधांचा विचार करण्यात येतो आणि मग हे ठरवण्यात येते की या देशासोबत आपल्या देशाचं राजकारण, सेना आणि अर्थव्यवस्थेचं किती कनेक्शन आहे. या गोष्टीवर देखील विचार करण्यात येतो की आमंत्रण दिलेल्या पाहुण्याला बोलावल्यानं दुसऱ्या देशाशी असलेले संबंध खराब होत नाही ना? या सगळ्या गोष्टींवर विचार केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालय प्रमुख पाहुण्याच्या नावावर शिक्कामोर्तेब करतात.

परराष्ट्र मंत्रालयाने नाव ठरवल्यानंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडून मंजूरी घेण्यात येते. मंजूरी मिळाल्यानंतर देशाचे राजदूत प्रमुख पाहुणे त्यावेळी येऊ शकतील की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याचं कारण म्हणजे कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षांचा जर शेड्यूल खूप व्यस्त असणं ही साधारण गोष्ट आहे. त्यामुळे प्रमुख पाहुण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून एक यादी तयार करण्यात येते. त्यात अनेक ऑप्शन्स असतात. प्रमुख पाहुणे
त्यावेळी उपलब्ध आहेत की नाही यावरून सगळं पुढे ठरतं. अखेर हे कळाल्यानंतर भारत आणि प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आलेल्या देशासोबत अधिकारीकपणे चर्चा होते. अखेर सगळं बोलणं झाल्यानंतर प्रमुख पाहुण्याच्या नावावर शिक्कामोर्तेब होतो.

तब्बल ६ महिने आधी सुरु होते ही प्रक्रिया

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणत्याही प्रमुख पाहुण्याचं आमंत्रण आणि त्यांच्या स्वागत-सत्कारासाठीची ही प्रक्रिया तब्बल 6 महिने आधी सुरु होते. या सगळ्यात निमंत्रण पाठवणं आणि निमंत्रण स्विकारल्यानंतर प्रमुख पाहुणे येण्यावर आणि पूर्णपणे त्यांना खास पाहुणचार देण्यासाठी सगळी व्यवस्था, खास जेवण, कार्यक्रम या सगळ्यांची तयारी करण्यात येते.

भारतात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं येणाऱ्या प्रमुख पाहुण्याचे विशेष स्वागत करण्यात येते. अनेक औपचारिक कामांमध्ये प्रमुख पाहुणे आघाडीवर राहतात. भारताच्या राष्ट्रपतींसमोर त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला जातो. दुपारी प्रमुख पाहुण्यांसाठी पंतप्रधान भोजनाचे आयोजन करतात. संध्याकाळी राष्ट्रपती त्यांच्यासाठी खास स्वागत समारंभ आयोजित करतात.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.