जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

मानवीय जीवनातील पाण्याची आवश्यकता आणि समाधान

1 min read

बीड सम्राट:(आरोग्य)मानवी शरीरात अंदाजे ७० टक्के पाणी असते. शरीरातील पेशींना पोषण पुरवण्यात आणि शरीराचे तापमान नियंत्रणात राखण्यास पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. पाणी अन्नाचे विघटन करण्यास तसेच पोषकद्रव्ये शोषण्यास मदत करते. याशिवाय बद्धकोष्ठतासारख्या समस्याही दूर ठेवते. पुरेसे पाणी पिल्यास त्वचा हायड्रेट आणि तरुण राहते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा सुधारते. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी पाणी मूत्रपिंडांना मदत करते.
त्यामुळे किडनी स्टोनसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. मेंदूचा ७३ टक्के भाग हा पाण्याने बनलेला असतो. डिहायड्रेशनमुळे मेंदूचे कार्य कमी होऊ शकते आणि डोकेदुखी होऊ शकते. पुरेसे पाणी प्यायल्याने मन तीक्ष्ण राहते आणि एकाग्रता वाढते. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या चांगल्या कार्यासाठी दररोज किती पाणी प्यावे.

दरदिवशी किती पाणी प्यावे?

प्रत्येक व्यक्तीने किती पाणी प्यावे हे तुमचे वजन, वय, लिंग, तुम्ही किती सक्रिय आहात, तेथील हवामान आणि तुमचे आरोग्य यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. प्रत्येकासाठी समान प्रमाण निर्धारित केले जाऊ शकत नसले तरी, शरीराला आवश्यक असलेल्या द्रवपदार्थांच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन दररोजच्या पिण्याच्या पाण्याचे प्रमाण निश्चित केले जाऊ शकते.

प्रत्येक व्यक्तीने वजनानुसार किती पाणी प्यावे?

एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या
मेयो क्लिनिकच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तीला प्रति किलोग्राम शरीराच्या वजनासाठी दररोज सुमारे ३५ मिली पाण्याची आवश्यकता असते. सोप्या भाषेत, तुमचे वजन जितके जास्त असेल तितके जास्त पाणी पिण्याची गरज आहे.

५० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज सुमारे १.७लिटर पाणी प्यावे.

६० किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज सुमारे २.१ लिटर पाणी प्यावे.

७० किलो ग्राम वजनाच्या व्यक्तीने दररोज सुमारे २.४ लिटर पाणी प्यावे.

८०किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज सुमारे २.८ लिटर पाणी प्यावे.

शारीरिक मेहनत नुसार पाण्याचं प्रमाण वाढवावे

काही लोक जड शारीरिक मेहनत करतात, जसे की व्यायाम किंवा गरम भागात राहतात त्यांना घामाने गमावलेले लिक्विड बदलण्यासाठी अधिक पाणी पिण्याची आवश्यकता असू शकते. अशा वेळी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक असते.


जेंव्हा जेंव्हा तहान लागेल तेंव्हा पाणी अवश्य प्या.

तुमच्या शरीराची तहान लक्षात घ्या आणि जेंव्हा तुम्हाला तहान लागेल तेंव्हा पाणी प्या.

याव्यतिरिक्त, लघवीचा रंग (पिवळा किंवा फिकट पिवळा असणं सामान्यतः पुरेशा हायड्रेशनचे लक्षण आहे) आणि लघवीची वारंवारता देखील तुमचे हायड्रेशन दर्शवू शकते.

नुसते पाणी पिणे पुरेसे नाही

पाण्याव्यतिरिक्त इतर द्रव पदार्थांचाही समावेश करा. लक्षात ठेवा की फक्त पाणी पियल्याने शरीरातील द्रव पुन्हा भरत नाही. हर्बल चहा, दूध, १००% फळांचा रस आणि अन्नातील पाणी देखील शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं .

आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे काही नियम

मानवीय आरोग्यासाठी पाणी चांगले आहे म्हणून गॅलन भर पाणी पिण्याची गरज नाही. आयुर्वेदानुसार पाणी पचणे देखील महत्त्वाचे आहे.
घाम येणे, बद्धकोष्ठता, कोरडे तोंड आणि लघवीत गडद पिवळेपणा असल्यास पाणी जास्त प्यावे.

🟥 जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर ३० मिनिटांनी पाणी प्या.

🟧 वातग्रस्त व्यक्तीने जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी प्यावे .

🟨 कफाचा त्रास असलेल्या किंवा जास्त वजनाच्या व्यक्तीने जेवणाच्या ३० मिनिटे आधी पाणी प्यावे.

🟩 उभे राहण्यापेक्षा बसून पाणी प्यायल्यावर अधिक चांगले आहे कारण पाणी तुमच्या शरीराद्वारे चांगले शोषले जाते.

🟦 सिप करून पाणी प्या आणि पाणी कधीही घटाघटा गिळू नका.

🟪 फ्रीजमधून थंड पाणी कधीही पिऊ नका कारण थंड पाणी तुमची पचनशक्ती कमी करते.

🟫 पाणी साठवण्यासाठी मातीची किंवा तांब्याची किंवा किमान स्टीलची भांडी वापरा.

(नोट: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. किंवा कोणालाही वैयक्तीक किंवा सामुहिकरीत्या कोणताही आरोग्य विषयक सल्ला दिला गेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते करा ! )

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.