जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

पंधरा हजार शासकीय आणि खासगी शाळा बंद होण्याच्या मार्गावर

1 min read

अकोला : (वृत्तसंस्था) ज्ञान हा शिक्षणाच्या माध्यमातून मिळतोय आणि शिक्षण हे शाळेपासून प्राप्त होतं. मात्र राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि खासगी शाळा मिळून असे सुमारे १५ हजार शाळा विद्यार्थी अभावी
बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

एकट्या विदर्भात बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या शाळांची संख्या ३५२३ आहेत.

या बाबतीत तातडीने पावले न उचलल्यास हजारों विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सरकारी शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रवाह पोहचविला जातो. या शाळाच बंद होत असल्याने शिक्षण व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बंद होणाऱ्या विभागनिहाय शाळांमध्ये मराठवाड्यातून संख्या खालीलप्रमाणे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ): ३४७

नांदेड : ३९४

हिंगोली : ९३

परभणी : १२६

जालना : १९०

बीड : ६३३

लातूर : २०२

धाराशिव (उस्मानाबाद) :१७८

खान्देशमध्ये जळगाव : १०७

धुळे : ९२

नंदुरबार : १९२

पश्चिम महाराष्ट्रात

सोलापूर : ३४२

सातारा : १४०

रत्नागिरी : १,३७५

सिंधुदुर्ग : ८३५

कोल्हापूर : ५०७

सांगली : ४१५

पालघर : ३१७

मुंबई उपनगर : ८६

मुंबई-२मधील : ३१

ठाणे : ४४१

रायगड : १,२९५

पुणे : १,१३२

नाशिक : ३३१

अहमदनगर : ७७५

महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून संख्या निहाय शाळांचा समावेश असून ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्यातून अकोला या जिल्ह्यातून शाळा बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गावोगावी भेटी देऊन, जनजागृती करीत आहेत.
शाळेत विद्यार्थी संख्या कशी वाढवली जाईल, शाळा टिकवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रसंगी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पातूरमध्येही दुसरी बैठक घेण्यात आली आहे.

या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गावंडे यांच्यासह शाळा बचाव समितीचे पदाधिकारी गजानन हरणे, जयदीप सोनखास्कर, विजय कौसल, दिनेश काठोके, सुरेश मेश्राम, राजेश देशमुख, व शशिकांत गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्रातील विभागनिहाय स्थिती

विदर्भ : ३,५२३

मराठवाडा : २,१६३

खान्देश : ३९१

पश्चिम महाराष्ट्र : ४,८३१

पुणे व मुंबई : ४,०९१

एकूण संख्या : १४,९९९