जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

मी भाजपची, मात्र भाजप थोडीच माझी आहे; जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी नितीन गडकरींसोर व्यक्त केली नाराजी

1 min read

नवी दिल्ली:भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमात केले आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यक्रमपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवारी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली.माझी कुठली पार्टी?समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे. भाजप माझी थोडीच आहे.

भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण भाजप हा मोठा पक्ष आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे….तर माहेरी जाणारपंकजा मुंडे म्हणाल्या, मी महादेव जानकरांच्या नेहमी संपर्कात असते. त्यांच्या रासप पक्षालाही मी नेहमी वेळ देत असते. महादेव जानकर तुम्ही या विषयावर बोला, त्या विषयावर पत्रकार परिषद घ्या, अशा सूचना मी नेहमी त्यांना देत असते. रासप पक्ष हा माझ्यासाठी माहेरासारखाच आहे. तर, भाजप पक्ष वडिलांसारखा आहे. वडिलांकडे काही झालच तर माहेरमध्ये माझ्यासाठी जागा आहेच ना, असे थेट वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले.कशाचीच भीती वाटत नाहीपंकजा मुंडे म्हणाल्या, मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणे हे मुंडे परिवाराच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाहीच झाले तर मी ऊस तोडायला जाईल. महादेव जानकर जातील मेंढ्या वळायला. अजून काय आहे. आम्हाला काही गमवायचे नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही.

You may have missed

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.