जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

ओडिशात रेल्वे भीषण अपघात २५० हुन अधिक प्रवाशांचा मृत्यू १००० जखमी

1 min read

वृत्त संस्था- ओडिशात बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ तिहेरी भीषण अपघात झाला असल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ७.१० वाजता सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल -हावडा सुपर फास्ट एक्सप्रेस या रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले व बाजूच्या रेल्वे रुळावरून चेन्नईला जाणारी शालिमार- चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस या गाडीने घसरलेल्या डब्यांना जोरदार धडक दिल्याने कोरोमंडल एक्सप्रेस चे बारा डब्बे बाजूला उभ्या असलेल्या एका मालगाडीला जाऊन धडकले अपघाताच्या आवाजाने परीसर हादरलं आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.सर्वत्र किंकाळ्या आणि वेदनांचा प्रवास सुरू झाला.या दुर्घटनेत २५० हुन अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे आणि १००० प्रवासी जखमी झाले आहेत. काही प्रवासी डब्यात अडकून असल्याचे समजते.एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून कालपासून बचाव कार्य सुरू आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.