जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

महाराष्ट्रात चक्रीवादळाचा धोका तीन दिवसा करीता अलर्ट जारी.

1 min read

मुंबई : हवामान खात्या नुसार सध्या देशात मान्सूनच्या हालचालींना प्रचंड वेग आला असून आता बिपरजॉय चक्रीवादळाचाही धोका निर्माण झाला असल्याचे संबंधित विभागाने कळविले आहे. सदरील चक्रीवादळ हे भारताच्या किनारपट्टी भागात येऊन पोहोचला आहे. हे चक्रीवादळ येणाऱ्या ४८ तासांमध्ये आणखीन तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून या चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे . भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या ३ दिवसांत बिपरजॉय चक्रीवादळ आणखीन तीव्र रूप धारण करील . म्हणजेच या चक्रीवादळाचा परिणाम देशासह राज्यातही पाहायला मिळणार असून महाराष्ट्र राज्यात ही तीन दिवसांचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर हवामान खात्याकडून आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील काही शहरांना अधिक प्रमाणात धोका आहे ज्यात मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी भागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील तसेच मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
संबंधित विभागाने ८ ते १० जून या दरम्यान मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली त्या नंतरही मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये अशी ही ताकीद करण्यात आली . १२ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहील असे अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळामुळे ताशी १३५ ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यात पाऊस ही पडण्याची दाट शक्यता असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.