जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

रेणापूर येथील पिडित कुटुंबाला ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिली भेट.

1 min read

लातुर:(प्रतिनिधी) लातुर जिल्ह्यातील रेणापूर या तालुक्यात घडलेल्या हत्याकांड प्रकरणातील पिढीत कुटुंबीयांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर व मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली तसेच लातूरचे पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांच्या सोबत मातंग समाजातील गिरधारी तपघाले हत्याकांडाशी निगडित सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. व योग्य अशी कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आले आहेत. तात्काळ या पिडीत कुटुंबाला समाज कल्याण विभागातर्फे ४ लाख रुपयांचे चेक देखील देण्यात आले आहे. कुटुंबाला संरक्षण व पुनर्वसन या गोष्टींवरही चर्चा झाली.या वेळी सुजात आंबेडकर,फारुख अहेमद ,रमेश गायकवाड,संतोष सुर्यवंशी पुरुषोत्तम वीर,बालाजी जगतकर तसेच लातुर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.