एक महिन्यात सुटणार बीडकरांचा पाणी प्रश्न -खुर्शिद आलम
1 min readबीड(प्रतिनिधी)बीड शहराला दर चार दिवसाला पाणी मिळेल एवढं पाणी तलावात उपलब्ध आहेत, पण नियोजन अभावी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाहीत, ज्या ज्या परिसरात पाणी पहोचत नाही त्या त्या भागात पाइपलाइन टाकण्याचे काम अमृत योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत, हे काम मे. प्रगती कन्स्ट्रक्शन , कपिलानंद लातुर या गुत्तेदाराला देण्यात आले होते,कामाचा कालावधी दोन वर्षांचे असतांना आज सहा वर्षे होत आली तरी काम पुर्ण झाले नाही त्यामुळे तहानलेल्या नागरिकांना पाणी मिळाले नाही म्हणून बीड नगरपरिषदेचे माजी सभापती खुर्शीद आलम यांनी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे मॅडम यांच्याकडे तक्रार केली होती या तक्रारीची विशेष दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या व नगरपरिषदेच्या सर्व प्रमुख अधिकार्यांसह संबंधित गुत्तेदाराचे इंजिनिअर तक्रारदारां समोर दोन वेळा बैठका घेतल्या आणि सर्वांनचे ऐकून घेऊन दि.१२/६/२०२३ रोजी गुत्तेदाराला सांगितले की अमृत जलवाहिनी योजना ११४ कोटी रुपयेची असुन त्यामधून गुत्तेदाराला आत्तापर्यंत ९३ कोटी मिळाले आहे .तरी सुद्धा तुम्ही काम पुर्ण केले नाही म्हणून नागरिकांना पाणी मिळाले नाही, आता एक महिन्याच्या आत काम पुर्ण झाले नाही तर ५० लाख रुपये रिकाॅव्हरी वसुल करुन तुमच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले आहेत, आता पुढची बैठक येत्या सोमवारी होणार असून सलग तिसऱ्या बैठकीत कामाचा आढावा घेणार आहेत यावरूनच असे दिसून येते की जिल्हाधिकारी मॅडम आता बीड वासियांना कायमस्वरूपी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊनच थांबणार आहेत अशी प्रतिक्रिया तक्रारदार माजी सभापती खुर्शीद आलम यांनी व्यक्त केली आहेत, सदर बैठकीत नगरपरिषदे मुख्याधिकारी अंधारे मॅडम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता चिवरे साहेब,उप अभियंता गिरी साहेब, उप अभियंता वाघसाहेब, उप अभियंता ताडके साहेब, इंजिनिअर कुलकर्णी साहेब, इं.किरण, माजी सभापती खुर्शीद आलम, नगरसेवक गुंजाळ,नगरसेवक बाबुराव मुळुक, नगरसेवक बनसोडे, शेशेराव तांबे,नगरसेवक इटकर,अमोल पऊळ, रेहाना पठाण, शहेबाज बाॅस आदी मान्यवर उपस्थित होते.