जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

आता BSNL ने दरमहा १२६ रुपयांची स्वस्त रिचार्ज ऑफर आणली आहे

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था)मोबाइल जगात ब-याच कंपन्या असून आपले व्यवसाय कायम ठेवण्याकरिता तसेच व्यवसाय वाढविण्याकरिता धडपडत आहे. सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्या एकापेक्षा एक रिचार्ज ऑफर घेऊन येत आहेत. यामध्ये नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच आहे त्या ग्रहाकांना कायम ठेवण्यासाठी सर्वच कंपन्यात शर्तीचे प्रयत्न चालू असून या शर्यतीत सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी BSNL देखील आहे. बीएसएनएलने देखील खास अशी १,५१५ रुपयांची वार्षिक योजना ऑफर केली आहे. यामध्ये अनेक बंपर फायदे दिले जात आहेत. बरेच लोक अजूनही सेकंडरी सिम म्हणून तरी BSNL चा अजूनही वापर करीत आहे.BSNL च्या १,५१५ 5g प्लानचे तपशील जाणून घेण्यासाठी अधिक वाचा.
या प्लानमध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा दिला जात आहे. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. या प्लानमध्ये, दैनिक डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40KBPS राहील. संपूर्ण वैधते दरम्यान, वापरकर्त्यांना एकूण 730 GB डेटा दिला जाणार आहे . तसेच यामध्ये वापरकर्त्यांना दमदार अशी ३६५ दिवसांची वैधता दिली जात आहे. एक सेकंडरी सिम म्हणून जर तुम्ही BSNLचा वापर करीत असाल आणि तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास घ्यायचा नसेल, तर तुम्हाला ही योजना फायदेशीर आणि खूप आवडणारी ठरु शकते.
या प्लाननुसार प्रत्येक महिन्याचा खर्च बघितला तर तो १२६ रुपये येईल . त्याच वेळी, दररोजचा खर्च मात्र ५ रुपयांहून कमी इतका असेल. जर तुम्हाला असा प्लान हवा असल्यास ज्यात डेटा, कॉलिंगसह संपूर्ण वर्षाची वैधता दिली जात असेल तर तुम्हाला हा प्लान नक्कीच आवडू शकतो. तुम्ही ते बीएसएनएल ॲप व्दारे किंवा संकेतस्थळावरून रिचार्ज करू शकता. हे प्लान फक्त काही टेलिकॉम सर्कलमध्ये दिले जात आहे. रिचार्ज करण्यापूर्वी प्लान विषयी अधिक किंवा पुरेशी माहिती घेणे आवश्यक आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.