जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

भारत-पाकिस्तान फुटबॉल स्पर्धेत राडा, खेळाडू प्रशिक्षकाला भिडले

1 min read

बंगळुरु: ( वृत्तसंस्था)- सध्या फुटबॉल स्पर्धेची मालिका सुरू असून दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरु असताना जोरदार राडा झाला आहे. भारताचे प्रशिक्षक आणि पाकिस्तानचे खेळाडू यांच्यामध्ये हा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. राडा होण्यामागचे कारण
भारताने या सामन्यात सुरुवातीच्या १५ मिनिटांमध्येच गोल केले होते. मध्यंतरापर्यंत भारताने या सामन्यात २-० अशी आघाडीही घेतली होती. पण तरीही भारताचे प्रशिक्षक इगोर स्तिमॅक यावेळी भडकल्याचे पाहायला मिळाले. हा सामना सुरु असताना फुटबॉल टच लाईनच्या बाहेर गेला त्यामुळे पाकिस्तानला थ्रो करण्याची संधी मिळाली. त्यामुळे पाकिस्तानचा खेळाडू हा चेंडू मैदानात टाकण्यासाठी सज्ज झाला होता. पण त्यावेळी भारताचे प्रशिक्षक स्तिमॅक हे भडकले. कारण सदरील प्रकार घडत असताना भारताच्या खेळाडूविरोधात फाऊल झाले होते. पण पंचांनी मात्र त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे स्तिमॅक यांना राग आला आणि त्यानंतर ते पाकिस्तानच्या खेळाडूकडे गेले. पाकिस्तानचा खेळाडू हा चेंडू मैदानात टाकण्याच्या तयारीत होता. त्यावेळी स्तिमॅक यांनी तो चेंडू उडवला आणि त्यानंतर राडा सुरु झाला. यानंतर पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या प्रशिक्षकाच्या अंगावर धावून गेले. तितक्यात पंच धावत त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. भारताच्या काही खेळाडूंनीही यावेळी मध्यस्थी केली आणि हा प्रकार निवळला गेला. पण या सर्व प्रकारानंतर भारताचे प्रशिक्षक स्तिमॅक यांना मात्र रेड कार्ड दाखवण्यात आले आहे. सध्या स्थितीत होणा-या फुटबॉल सामन्यात भारताचे सर्व प्रतिस्पर्धी संघांचे मानांकन भारतापेक्षा कमी असून भारतच या स्पर्धेतील संभाव्य विजेता मानला जात आहे. मात्र, प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखू नका असे भारताचे मार्गदर्शक इगॉर स्तिमॅक यांनी भारतीय संघातील खेळाडूंना बजावले आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक साखळीत भारतासमोर नेपाळ, पाकिस्तान आणि कुवेतचे मोठं आव्हान आहे. गटातील चारही प्रतिस्पर्धी भिन्न आहेत. गटसाखळीतील लढती सोप्या नाहीत. कोणत्याही स्पर्धेत खेळताना संघाची ताकद वाढलेली असते हे विसरू नका, असे स्तिमॅक यांनी स्पर्धा सूरू होण्यापूर्वी सांगितले.
या बाबतीत कोणत्या प्रकारचा खेळ मैदानावर होऊ शकतो, हे मार्गदर्शक सांगू शकतात. मात्र, प्रत्यक्ष खेळ खेळाडूंनाच खेळायचा असतो, असेही त्यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांनी पाकिस्तानचा संघ धोकादायक ठरू शकतो. फारसा सराव नसताना त्यांनी मॉरिशसमधील स्पर्धेत चांगली कामगिरी केली. आता त्यांना चांगला सराव लाभला आहे, हे दुर्लक्षित करता येणार नाही, असा इशारा ही स्तिमॅक यांनी दिला होता.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.