जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

पेन्शन धारकांना संधी, उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जुलै पर्यंत

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था) सेवानिवृत्ती झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणारा निधी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPFO च्या सदस्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. ज्यांनी अद्याप सेवानिवृत्तीनंतर EPFO कडून जास्त पेन्शनसाठी अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ईपीएफओने पुन्हा एकदा वाढीव पेन्शन योजनेत अर्ज करण्याची मुदत वाढवून दिली असून यापूर्वी अंतिम मुदत २६ जून होती.मात्र ईपीएफओने सलग दुसऱ्यांदा वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. आता ईपीएफओचे सदस्य ११ जुलैपर्यंत अर्ज करू शकतील.उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदतीची ही दुसरी मुदतवाढ असून यापूर्वी, ती ३ मे २०२३ पासून २६ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती.दरम्यान, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPS (कर्मचारी पेन्शन योजना) अंतर्गत सदस्य उच्च निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करू शकतात. पात्र पेन्शनधारक/सदस्यांना येणारी कोणतीही अडचण दूर करण्यासाठी १५ दिवसांची शेवटची संधी दिली जात आहे, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे. EPFO जास्त पेन्शनसाठी
ई-सेवा पोर्टलला भेट द्या https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
उजव्या बाजूला असलेल्या पेन्शन ऑन हायर सॅलरी पर्यायावर क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल.त्याच्या Click Here पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्हाचा UAN, नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.यानंतर, नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून पडताळणी करा.
लक्षात असू द्या की फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच जास्त पेन्शनचा लाभ मिळेल, ज्यांचे EPS-95 चे सदस्य असताना EPFO ने जास्त पेन्शनचा पर्याय स्वीकारला नाही. EPFO ने १ सप्टेंबर २०१४ नंतर पीएफ खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPS द्वारे उच्च निवृत्ती वेतन निवडण्याचा पर्याय दिला असून या अंतर्गत १५,००० पेक्षा जास्त कमाई करणार्‍यांना देखील आता EPS मध्ये ८.३३ टक्के योगदान देण्याची संधी दिली जाईल, जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतर अधिक पेन्शन मिळू शकेल. तरी निवृत्ती धारकांनी या उच्च निवृत्ती वेतनाचा अवश्य लाभ घ्यावा.

You may have missed

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.