जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

बुलढाणा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात, २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू

1 min read

बुलढाणा: (प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा मार्गावर आज रात्री नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बसला आग लागली. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला असून बसमध्ये एकूण ३३ प्रवासी प्रवास करत होते. त्यातून २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.अपघातग्रस्त बस ही विदर्भ ट्रॅव्हल्सची असल्याची माहिती समोर आली आहे. ही बस नागपूरहून पुण्याकडे निघाली होती. या बसचा अपघात पहिल्यांदा बस खांबाला धडकल्यानंतर पलटी झाली आणि त्यात आग लागली. बस डाव्या बाजूला कोसळली त्यामुळं दरवाजा उघडण्याचा मार्ग बंद झाला होता. यामुळे प्रवाशांना बाहेर पडण अशक्य झालं. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार २५जणांचा मृत्यू झाला आहे. बस मध्ये एकूण ३३ जण प्रवास करत होते. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस प्रवास करत होती. बुलढाण्यातील सिंखेडराजा जवळील परिसरात या बसला अपघात झाला. बसमधील आठ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. बस दुभाजकाला धडकली त्यावेळी समोरचा एक्सेल तुटला होता. समोरची चाक बस पासून वेगळी झाली होती. त्यानंतर आग लागली. या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर काही प्रवाशांनी काचा फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. काचा फोडून बाहेर आलेल्या प्रवाशांचा जीव वाचला आहे.
त्यांनी काही प्रवाशांना बाहेर काढले. हा अपघात रात्री १.२६ मिनिटांनी झाल्याची माहिती मिळत आहे. या बसमध्ये नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी असण्याची शक्यता आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.