जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच पुनर्विस्तार

1 min read

मुंबई: (प्रतिनिधी) काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजूनही मंत्रिमंडळात विस्तार होणार का,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूआहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून मंत्रिमंडळ विस्तार होणार,ही चर्चा दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरही कायम आहे.सध्या मुख्यमंत्री , २ उपमुख्यमंत्री आणि २६ मंत्री झाले आहेत. एकूण आमदारांच्या १५ % म्हणजे ४३ पर्यंत मंत्री संख्या नेण्याची संधी सरकारला असल्याने आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार का , याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.एकूण २९ मंत्रिपदे व्यापली गेली आहेत.अजूनही १४ मंत्रिपदे रिक्त आहेत.नवे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार ४० दिवसांनंतर झाला होता.
दरम्यान कोणत्या खात्यांचे होऊ शकते वाटप ? सध्या मुख्यमंत्र्यांकडील खाती : सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम), परिवहन,पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य,मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन,मृद व जलसंधारण, पर्यावरण,खार जमीनी विकास, अल्पसंख्याक विकास व औकाफ. यापैकी नगरविकास, सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम ही खाती मुख्यमंत्री शिंदे स्वतः कडेच राखतील. उर्वरित खाती ते राष्ट्रवादीला देणार की आगामी काळातील विस्तारात आपल्या आमदारांसाठी राखून ठेवणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
तसेच उपमुख्यमंत्री फडणवीसांकडील खाती: गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार. महाविकास आघाडीत अजित पवार हे वित्तमंत्री होते तरी. दोघांतील मैत्रीखातर फडणवीस हे खाते त्यांच्याकडे सोपतात का हे पाहावे लागेल. गृहनिर्माण ही खाती फडणवीसांकडेच राहण्याची शक्यता असून त्यांच्याकडील अन्य खाती ते भाजपमधील आमदारांसाठी ठेवतात की राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाचे अतिरिक्त खाती असलेले मंत्री: राधाकृष्ण विखे पाटील ( महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास)
सुधीर मुनगंटीवार ( वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय)
चंद्रकांत पाटील ( उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य)
गिरीश महाजन ( ग्रामविकास-पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण)
रविंद्र चव्हाण ( सार्व.बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण )
मंगलप्रभात लोढा ( पर्यटन, कौशल्य विकास आणि उद्योजगत , महिला व बालविकास)
अतुल सावे ( सहकार , सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग , भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग)
तसेच शिंदे गटाच्या मंत्र्यांकडे असलेले अतिरिक्त खाती:
दीपक केसरकर (शालेय शिक्षण व मराठी भाषा)
तानाजी सावंत ( सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण)
संदीपान भुमरे ( रोजगार हमी, फलोत्पादन)
दादाजी भुसे ( बंदरे व खनिकर्म)

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.