जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

कोणता नेता साधा वाटतो नरेंद्र मोदी की राहुल गांधी या प्रश्नाचे उत्तर उर्मिला मातोंडकराने असे दिले

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- सध्या लोकप्रिय ठरत असलेल्या अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात सिनेसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखती न दाखवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान गेल्या भागात बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिची मुलाखत प्रेक्षकांना पाहायला मिळाली .
उर्मिलाने शोचा होस्ट अवधूत गुप्ते याच्यसोबत अनेक विषयांवर गप्पा मारल्या. बालपण, फिल्म इंडस्ट्रीतलं करिअरबद्दल उर्मिलाने अनेक गोष्टींवर स्पष्टीकरण दिले, त्यातच काही गोष्टी नव्याने सांगितल्या. तर तिचे सहकलाकार अनिल कपूर, आमिर खान , शाहरुख खान यांच्यासोबतच्या चांगल्या आठवणीही तिने साझा या केल्या आहेत.सुरुवातीला उर्मिलाने तिच्या बालपणाबद्दल सांगितले. जुन्या आठवणी सांगत उर्मिलाने तिच्या कुटुंबाबद्दल सांगितले. आर्थिक अडचणींमुळे तिने कधीही तिचा वाढदिवस साजरा केला नाही, असे उर्मिलाने सांगितले. आई-वडिलांकडे पैसे कमी होते, तरी त्यांनी सगळ्याचा समोतल राखत आम्हाला वाढवले, असे उर्मिला म्हणाली.घरातल्या पैशांच्या कमतरतेमुळे मी आणि माझ्या भावाने कधीही वाढदिवस साजरा केला नाही. असे असले तरी मला माझ्या पालकांनी नेहमीच दुसऱ्यांसाठी काही तरी करायला शिकवले. पैसे एखाद्या संस्थेला दान करा,असे ते नेहमी सांगायचे, असेही उर्मिलाने सांगितले. तर माझे भाग्य आहे की, मी अशा कुटुंबात जन्मले , असंही उर्मिला म्हणाली.शोमध्ये दिग्दर्शक एन. चंद्रा यांचा एक व्हिडिओ दाखण्यात आला. या व्हिडिओत ते उर्मिलाला प्रश्न विचारतात की, त्यांनी तिला इतके हिट सिनेमे दिले ,तरी ती त्यांचे कोणत्याही मुलाखतीत नाव का घेत नाही. यावर उर्मिलाने त्यांची माफी मागितली. एन. चंद्रा यांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे, पण मी त्यांना विसरले नाही, मी त्यांची नेहमीच ऋणी राहीन, असे उर्मिला म्हणाली.
तसेच उर्मिलाने तिच्या लग्नावरही भाष्य केले. उर्मिलाने जेंव्हा लग्न केले, तेव्हा तिने धर्म परिवर्तन केल्याचे म्हटले गेले होते. यावर आता तिनं उत्तर दिले आहे. माझ्या नवऱ्याने आणि त्याच्या कुटुंबाने मला कधीही धर्म परिवर्तन करण्यास सांगितले नाही. आम्ही दोघंही एकमेंकांच्या धर्मांचा आदर करतो. मी नेहमीच हिंदू असेन. मी माझा धर्म बदलला नाही, असे ही उर्मिलाने या मंचावर स्पष्ट केले. तसेच मला नेहमीच या सगळ्या गोष्टींमुळे ट्रोल केले जाते, हे सगळे विचित्र असल्याचे तिने म्हंटले आहे.
उर्मिलाने या शोमध्ये नवरा मोहसिन अख्तरसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. बॉलिवूडचा लोकप्रिय फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या भाचीच्या लग्नात आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. नंतर आम्ही चांगले मित्र झालो आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला असे उर्मिलाने सांगितले.उर्मिला राजकारणातही प्रचंड सक्रिय असल्याने राजकीय गप्पाही रंगल्या. राज ठाकरे की उद्धव ठाकरे..कोणते ठाकरे महाराष्ट्र समर्थपणे सांभाळू शकतात? असा प्रश्न अवधूतने उर्मिलाला विचारला. यावर तिने अतिशय डिप्लोमॅटीक असं उत्तर दिले. दोघंही एकत्रीतपणे , सोपे आहे.. असे तिने म्हटले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचा फोटो दाखवत एक प्रश्न विचारला. कोणता नेता साधा माणूस वाटतो नरेंद्र मोदी की राहुल गांधी..असा हा प्रश्न होता. हा प्रश्न काय आहे.. असे म्हणत, तिने या प्रश्नाचे हास्यातून उत्तर दिले.