जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

प्लास्टिक सर्जरीबद्दल काजोलचे अभिनेत्रींना सल्ला

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था) हिन्दी चित्रपट विश्वातील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री काजोल. ती सध्या ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटाचे प्रमोशन करतेय. याच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत काजोल प्लास्टिक सर्जरीबद्दल व्यक्त झाली. या मुलाखतीत तिने तरुण अभिनेत्रींना प्लास्टिक सर्जरीबद्दल मोलाचा सल्ला दिला आहे. सौंदर्यविश्वात एक विषय फार चर्चेत आहे तो म्हणजे प्लास्टिक सर्जरी.
काही वर्षांपासून या शस्त्रक्रियेचा अवलंब करण्याचा लोकांमध्ये कल वाढला असून यामुळेच त्याच्याशी संबंधित दवाखान्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसे, प्लास्टिक सर्जरी आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये ही प्रक्रिया स्वीकारणे खूप सामान्य आहे.या गोष्टीमध्ये काजोलचे नाव पहिले घेतले जाते.
भारतात गेल्या काही वर्षांत प्लास्टिक सर्जरी करणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे. संडे गार्डियनच्या वृत्तानुसार, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एस्थेटिक प्लॅस्टिक सर्जन्सच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की कॉस्मेटिक सर्जरीच्या बाबतीत भारत पहिल्या १० देशांपैकी एक आहे.
एका मुलाखतीत प्लास्टिक सर्जरी विषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना काजोलने तरुण अभिनेत्रींना सल्ला दिला आहे की, २५ जणांनी प्लॅस्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिल्याने कोणीही प्लास्टिक सर्जरी करू नये. तुम्ही जसे आहेत तसे स्वतःला स्वीकारा. इतरांच्या मते किंवा विचारानुसार स्वतःचे मोजमाप करणे योग्य नाही. सत्य हे आहे की कोणी कितीही सुंदर असले तरी लोक त्यांच्यात दोष शोधत असतात.
दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीच्या मतांना महत्त्व देण्याऐवजी स्वतःला स्वीकार करा. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात. नेहमी पॉझिटिव्हिट संदेश देणाऱ्या काजोलने तरुण अभिनेत्रींना कोणत्याही परिस्थितीत चार लोक काय म्हणतील असा विचार करू नका. असे संदेश दिले आहे. तिने पुढे सांगितले की, देवाने प्रत्येकाचे शरीर वेगळे आणि खास बनवले आहे. एखादी गोष्ट तुमच्या आवडीची नसेल, तर मेकअपचा वापर करून तुम्हाला हवा तो आकार दिला जाऊ शकतो. पण प्लास्टिक सर्जरी हा पर्याय असू शकत नाही.सर्वात लोकप्रिय प्लास्टिक/कॉस्मेटिक शस्त्रक्रिया म्हणजे नाकाची शस्त्रक्रिया, सुरकुत्या कमी करणे, केस प्रत्यारोपण , पोट टक, स्तन वाढवणे किंवा कमी करणे आदी गोष्टींची सर्जरी करण्याची अभिनेत्रींमध्ये स्पर्धाच लागलेली दिसत आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.