जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

लाच देणाऱ्यावरही कारवाई करावी,वानखेडेंच्या या मागणीमुळे शाहरुख खान अडचणीत

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी निकाल जाहिर केला असून सीबीआय खंडणी आणि लाचखोरी प्रकरणातील आरोपी असलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना न्यायालयाने त्यांच्या याचिकेत बदल करण्यास आणि अधिक तपशील जोडण्याची परवानगी दिली आहे. ज्यामध्ये लाच देणाऱ्यावरही कारवाई करावी, तसेच सीबीआयने त्यांचेही नाव यामध्ये समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली होती.समीर वानखेडे हे एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये महासंचालक पदावर होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात अडकवू नये म्हणून त्यांनी आणि इतर चार आरोपींनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मात्र हा करार १८ कोटी रुपयांना निश्चित झाला होता. त्यानंतर मे २०२३ मध्ये, वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत खटला बंद करावा आणि अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती.आता बुधवार, ५ जुलै २०२३ रोजी वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा, रिजवान मर्चंट आणि स्नेहा सानप यांनी याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७A आणि ८ शी संबंधित अतिरिक्त आधारांचा समावेश करण्यासाठी याचिकेत सुधारणा करणार असल्याचे सांगितले. तसेच, ज्या व्यक्तीने सरकारी कर्मचाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला किंवा देऊ केला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे म्हंटले आहे. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि एसजी देगे यांच्या खंडपीठाने याचिकेत दुरुस्ती करण्यास परवानगी दिली परंतु ते पुढील सुधारणांना परवानगी देणार नसल्याचेही सांगितले. आता या याचिकेवर २० जुलै २०२३ रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत सीबीआयला या सुधारित याचिकेवर उत्तर द्यावे लागेल. एवढेच नाही तर न्यायालयाने समीर वानखेडेचे सुरक्षाही तोपर्यंत वाढवली आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.