जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

सोनोग्राफीत जुळी , प्रसुतीत मात्र चार मुली जन्माला आली, निसर्गाचं चमत्कार

1 min read

अमरावती: (वृत्तसंस्था)- व्याघ्रप्रकल्पासाठी प्रसिद्ध आणि कुपोषणाने बालमृत्यूच्या कारणांमुळे कुप्रसिद्ध असलेल्या मेळघाटात एकाच वेळी आईने दिला चार बाळांना जन्म. जागात आणि देशाच्या विविध भागात सातत्याने वेगवेगळ्या आणि चमत्कारिक घटना घडत असतात. अशीच एक घटना मेळघाटात घडली आहे. मेळघाटातील दूनी या गावातील एका गर्भवती महिलेने धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात एकाचवेळी चार मुलींना जन्म दिला आहे. आई आणि चारही मुली सुखरूप असून एकाच वेळी चार मुलींचा जन्म झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.दूनी गावातील रहिवासी पपीता बळवंत उईके (२४) ही पती बळवंत उईके याच्यासोबत वरुड तालुक्यात मजुरीचे काम करते. तिला गर्भधारणा झाल्यानंतर तिने दूनी येथील आरोग्य उपकेंद्रात गर्भवती झाल्याची नोंद केली. पपीता उईके आणि बळवंत उईके या दाम्प्त्याला पहिला मुलगा देखील आहे.दरम्यान मजुरी काम करत असताना पपीता उईके या पाच महिन्याच्या गर्भवती असताना त्यांना त्रास जाणवला होता. त्यानंतर त्यांनी वरुड येथील एका खाजगी रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी केली. यावेळी त्यांना जुळं बाळ होणार असे सांगण्यात आले.आठव्या महिन्यातील सोनोग्राफीत देखील जुळं बाळ दिसलेले. आठवा महिना सुरू असताना पपीता यांची दुसऱ्यांदा सोनोग्राफी केली गेली. त्यावेळीदेखील गर्भात दोनच बाळ असल्याचे स्पष्ट झाले होते. असे असताना प्रसुतीसाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूती दरम्यान पपीता उईके यांनी पहिल्या बाळ जन्मल्यानंतर एकापाठोपाठ एक अशा चार मुलींना जन्म दिल्याने डॉक्टरांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
सध्या चारही बाळांची प्रकृती चांगली असून चारही बालकांचं वजन १ किलो ३०० पेक्षा कमी असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पपीता यांचीही प्रकृती चांगली असून अधिक काळजी घेतली जात असल्याची माहिती धारणी उपजिल्हा रुग्णालयातील बालरोग तज्ञ तसंच वैद्यकीय अधीक्षक दयाराम जावरकर यांनी दिली आहे.तसेच उपजिल्हा रुग्णालयातील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.प्रीती शेंद्रे, परिचारीका तेजस्वी गोरे,नंदा शिरसाट यांच्या टीमने महिलेची सुखरूप आणि सुरक्षित प्रसुती केली. डॉक्टरांच्या मेहनतीने आई आणि चारही बालकं सुखरूप असल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.