जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

मुंबई- नाशिक महामार्गावर ट्रेलर आणि टॅक्सीचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू

1 min read

नाशिक: (प्रतिनिधी)- सकाळी मुंबई-नाशिक महामार्गावर ट्रेलर आणि टॅक्सीचा भीषण अपघात झाला. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी- पिवळी टॅक्सीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की टॅक्सी सुमारे ६० फूट दूर फेकली गेली . या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असे ६ प्रवासी ठार झाले तर ६ जण जखमी झाले. थरकाप उडवणारी ही घटना मंगळवारी सकाळी घडली आहे . अपघातानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदरील अपघात हा टॅक्सी रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टॅक्सी सुमारे ६० फूट दूर फेकली गेली.
या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या अपघाताचा पुढील तपास पडघा पोलिस करीत आहे. या आधीही सदरील परिसरात खडवली फाट्याजवळ एका ट्रेलरने आईस्क्रीमच्या गाडीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला होता. आज सकाळी पुन्हा याच ठिकाणी ट्रेलरने टॅक्सीला जोरदार धडक दिल्याने ६ जणांना प्राण गमवावे लागले.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.