जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

बॅंकेंचा कामकाज आता आठवड्यात राहणार पाच दिवस, यूबीएफयूच्या बैठकीत होणार निर्णय

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था)- नुकताच सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळासाठी पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू केला असून तसेच बँक कर्मचाऱ्यांना ही लवकरच आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय बँकांमध्ये आठवड्यातून फक्त पाच दिवस काम आणि दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी प्रस्तावित असून यावर २८ जुलै रोजी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. इंडियन बँकिंग असोसिएशन (IBA) पुढील आठवड्यात शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) बैठकीत याबाबत निर्णय घेईल, असे अहवालात म्हंटले आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने १९ जुलै रोजी सांगितले की त्यांनी मागील चर्चेत पाच बँकिंग दिवस सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. “आयबीएने माहिती दिली की हा मुद्दा विविध भागधारकांच्या सक्रिय विचाराधीन आहे आणि त्यावर प्रक्रिया केली जात आहे. आम्ही IBA ला हे जलद करण्यास सांगितले आहे जेणेकरुन दर आठवड्याला पाच बँकिंग दिवस कोणताही विलंब न करता सुरू करता येतील.” CNBC च्या अहवालानुसार, दोन्ही संस्था २८ जुलैच्या बैठकीत पाच दिवसांचा कामाचा आठवडा, पगारवाढ आणि सेवानिवृत्तांसाठी गट वैद्यकीय विमा पॉलिसींची आवश्यकता यावर चर्चा करणार आहेत. दरम्यान सध्या बँका महिन्यातून दोन शनिवार सुरू असून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेतील कामकाज बंद असते. UBFU ने बँकांचे कामकाजाचे दिवस आठवड्यातून फक्त पाच दिवस सुरू राहील, तसेच कर्मचार्‍यांना दोन दिवस साप्ताहिक सुट्टी मिळावी अशी मागणी केली आहे. सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) पाच दिवसांच्या कामकाजाचा नियम लागू केल्यानंतर पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याची गरज भासू लागली. UBFU च्या बँक कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा कामाचा आठवडा करण्याच्या मागणीवर त्यांचा कोणताही आक्षेप नाही असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यापूर्वी कळवले होते. इंडियन बँकिंग असोसिएशनने याबाबत सरकारला प्रस्ताव पाठवला होता आणि आगामी आठवड्यात हा प्रस्ताव मान्य झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस काम आणि दोन दिवसाची साप्ताहिक सुट्टी मिळेल. परंतु यादरम्यान, कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास मात्र वाढतील ज्यात आणखी ४० मिनिटांची भर पडेल.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.