जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

२५ पोलीसांना त्या एकट्याने पाच तास पळवले, लातूर येथील थरकाप उडवणारी घटना

1 min read

लातूर: (वृत्तसंस्था)- प्रत्येक शहरात किंवा हायवे वर मुक्तपणे संचार करताना मनोरुग्ण दिसत असतात. काही मनोरुग्ण शांतपणे समाजात वावरतात तर काही अधिक उग्र रूप धारण करतात . त्यांच्या पासून लोकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. असाच काही प्रकार लातूर शहरात घडला आहे. शहरात भरदुपारी घडलेल्या एका घटनेने सर्वांच्याच हृदयाचा थरकाप उडवला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हातात कोयते घेऊन एक मनोरुग्ण बोरफळ परिसरात दहशत माजवत होता. त्याने तिघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. जवळपास २५पोलीस ५ तासांपासून या मनोरुग्णाला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या अंगावर तो धाऊन जात होता. शेवटी दोन तरुणांनी धाडस दाखवत त्याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. लातूर शहरात गेल्या तीन दिवसांपासून एक मनोरुग्ण मोकाट फिरत होता. त्याच्या हातात धारदार शस्त्रे होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करत दहशत माजवत होता. या मनोरुग्णाने तीन दिवसात पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. आज जवळपास २५पोलीस ५ तासापासून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी २ तरुणांनी धाडस दाखवत त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी येऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील बहुतेक सर्व तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक कैदी असल्यामुळे यापैकी अनेक कैद्यांना वेगेवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये मनोरुग्णांची संख्याही फार मोठी असल्याचे आरोग्य विभागातील उच्चपदस्थांचे म्हणणे आहे. सध्या राज्यातील सर्व तुरुंगात मिळून सुमारे अडीच हजार मनोरुग्ण कैदी आहेत. या कैद्यांसाठी मानसोपचारासाठी आवश्यक असलेली औषधेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून त्यासाठी नवीन तुरुंग बांधण्याचे काम हाती घेतले आहे. कैद्यांच्या आरोग्याच्या प्रश्नातही आपण लक्ष घालणार आहोत. रुग्णांच्या मानसिक आजार तसेच अन्य आजारांविषयी संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. तसेच रुग्णांच्या आरोग्याच्या प्रश्नांची योग्य ती काळजी घेतली जाईल. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.