जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 September 2024

माधुरी कडून प्रेरणा घेत ऋजुतांनीही केली बोट सवारी

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- सिनेमा इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र काही फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करायला त्यांचं मन घाबरत असते . मात्र आपल्यासारखाच दुसरा व्हिडिओ दिसला की तेदेखील आपला मोह आवरू शकत नाहीत. असंच काहीसं घडलंय एका मराठी अभिनेत्रीसोबत. लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने नुकताच बोट चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तो व्हिडिओ पाहून एका मराठी अभिनेत्रीने देखील तिचा बोट चालवतानाचा व्हिडिओ शेअर करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनीही तिच्या या साहसाचे कौतुक केले आहे. माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती स्पीड बोट चालवताना दिसते. तिच्यासोबत तिचे पती श्रीराम नेने आणि मुलंही आहेत. श्रीराम नेने हा व्हिडिओ शूट करत आहेत. ते थोडेसे घाबरलेले देखील दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने शेअर केला आहे.

नुकतीच ऋजुता केरळ येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. तिथे तिनेही बोट चालवण्याचा आनंद घेतला. तिने तो व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओत ती खूप शांतपणे बोट चालवताना दिसते. केरळमधील छान लाकडी हाऊसबोट चालवताना ती दिसत आहे. या व्हिडिओत तिने माधुरीच्या व्हिडिओच्या शेजारी तिचा व्हिडीओ जोडला आहे आणि ‘माझी बोट साधी आहे’ फक्त, असे लिहिले आहे.

हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, ‘फक्त गंमत म्हणून. काय योगायोग आहे. माझा हा व्हिडिओ १३ जुलैला शूट केला आहे. तोही केरळ येथे. आज माधुरी यांचा व्हिडिओ पाहून माझी व्हिडिओ पोस्ट करायची इच्छा झाली.’ तिच्या या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. आता तू खरंच एक बोट घे अशा प्रतिक्रिया तिला चाहत्यांनी दिल्या आहेत. तर एकाने बोट साधी असली म्हणून काय झालं बोट चालवणारी गोड आहे ना.. अशी कमेंट करत तिचे कौतुक केले असून नेटकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ बरंच पसंतीस उतरला आहे.