जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

दोन खाजगी बसेसची समोरासमोर धडक ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू तर ३०जखमी

1 min read

आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात दोन खाजगी बसेसची समोरासमोर धडक ६ प्रवाशांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाले आहेत.

बुलढाणा: (प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात दोन खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० जण जखमी असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात मलकापूर शहरातील महामार्ग क्रमांक सहावर आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झाला. सदरील घटनेची अधिक माहिती अशी की, अमरनाथ तीर्थयात्रा करून एम. एच. ०८, ९४५८ ही खासगी बस हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये जवळपास ४० भाविक होते. तर दुसरीकडे एम. एच. २७ बी. एक्स. ४४६६ ही बस नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जात होती. मात्र मलकापूर शहरातील लक्ष्मी नगर उड्डाणपुलावर येताच या दोन्ही बसेसची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहा प्रवाशांनी जागीच प्राण सोडले. तर अन्य जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या भीषण अपघातात दोन्ही बसेसचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी यांनी तातडीने भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.