जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणीच्या हिरव्या साडीतील फोटोंची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- ‘आई कुठे काय करते’ फेम तसेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मधुराणी प्रभुलकर घराघरात प्रसिद्ध असून मधुराणीने अरुंधती बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ती कायमच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. त्यासोबतच मधुराणी समाजमाध्यमावरही प्रचंड सक्रीय असते. ती नेहमीच तिचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत साझा करीत असते. तिच्या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देताना दिसतात. तिचे इंस्टाग्रामवरही लाखो फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोची चाहत्यांमध्ये चर्चा होते. असाच एक फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल झाला आहे. ज्यात ती हिरव्या रंगाच्या साडीत दिसते.

मधुराणी नेहमीच निरनिराळ्या थोडं हटके आउटफिटमध्ये चाहत्यांच्या भेटीला येत असते. अशाच एका सुंदर साडीमधला फोटो मधुराणीने शेअर केला होता. या साडीचीही चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली असून ही साडी आहे हिरव्या रंगाची. या साडीवर सुंदर अशी प्राजक्ताची पांढरीशुभ्र फुलंदेखील आहेत. या साडीमध्ये मधुराणीने दोन फोटो शेअर केले होते. त्यानंतर अनेकांनी या साडीची विचारणा करुन वेगवेगळ्या प्रश्न उपस्थित केल्या. जसं की ‘ही साडी कुठून घेतली, या साडीची किंमत काय, असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारले होते. मधुराणीने नेसलेली ही साडी ॲनजॉर(Anjor) या ब्रँडची आहे. ही साडी कॉटन स्लिक या प्रकारातील असून त्याची किंमत २९०० रुपये इतकी आहे. मधुराणी या साडीत नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आली आहे. यावेळेसही तिच्या डिझायनर साडीची चाहत्यांमध्ये खूप चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच मधुराणीच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आल्याचे म्हटले जात होते. मधुराणी घटस्फोट घेणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र तिच्या पतीने यासगळ्या चर्चा वायफळ असल्याचे सांगितले होते. दरम्यान या हिरव्या रंगाच्या साडीची खूप चर्चा होत असून मधुराणी या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.