जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

तीनशे वर्षांपूर्वीचा तो शाप आजही कायम ; लोक जात नाही भुताच्या भीतीने ‘त्या’ परिसरात

1 min read

राजस्थान या राज्यातील भानगडचा किल्ला . हा किल्ला भुतीया म्हणून लोकांत चर्चित आहे. या किल्ल्याचे बरंच किस्से कहाणी आहेत. दरम्यान जयपूरमधील 'कुलधरा' या गावात लोक रात्री तर सोडाच दिवसातही कोणी जात नाही . या गावाच्या जवळपास जायलाही लोक घाबरत असतात. नेहमी येथे सन्नाटा पसरलेला असतो या बाबतीत सदरील वृत्त आहे.

जयपूर: (प्रतिनिधी)- या जगात काही ठिकाणे अत्यंत भीतीदायक असून त्या ठिकाणी जायचे म्हंटले तर भल्याभल्यांची थरकाप उडते तसेच आपल्या देशात सुध्दा अनेक गूढ गुपितं लपलेली आहेत.


अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे जाण्यासही मनाई आहे. राजस्थान हे देखील एक असे राज्य आहे जिथे इतिहासाशी संबंधित अनेक रहस्ये आणि गुपिते लपलेली आहेत, ज्यामुळे ते राज्य आणखीनच खास बनते. राजा-महाराजांसाठी अत्यंत खास असेललं हे राज्य अनेक कारणांनी लोकांना घाबरवत आहे.

याच राज्यात भारतातील सर्वात भयंकर किल्ला देखील आहे, ज्याला भानगडचा किल्ला म्हणतात. पण, फक्त भानगडच नाही तर इथे एक भुताचे गावही आहे, जिथे लोक रात्रीच नाही तर दिवसाही जायला घाबरतात. या गावाची कहाणी खूपच भयंकर आणि घाबरवणारी आहे.

या गावाचे नाव कुलधरा आहे. जैसलमेरच्या पश्चिमेला सुमारे १७ किलोमीटर अंतरावर एक खंडर आहे. येथे तुटलेली घरे आणि भिंती दिसतात. पण, माणसं दिसत नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी या ठिकाणी कुलधरा नावाचे समृद्ध गाव होते. मात्र आता ते खंडर झाले आहे.

असे मानले जाते की इथले लोक हे रातोरात गाव सोडून गेले, जणू ते एका रात्रीत गायब झाले. त्यांच्यासोबत नेमके काय घडले की त्यांना घर सोडून जावे लागले. ही कहाणी ३०० वर्षांहून अधिक जुनी आहे.

त्या काळात या गावात पालीवाल ब्राह्मण राहत होते. असे मानले जाते की त्या काळात या ठिकाणी सलीम सिंहचे राज्य होते, ज्यांची वाईट नजर या गावातील प्रमुखाच्या मुलीवर पडली, जी अतिशय सुंदर होती.

त्याला त्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करायचे होते. त्याने गावकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले होते की, त्या मुलीला वाचवण्यासाठी कोणी मध्ये आले किंवा तिला लपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ठार मारले जाईल.

या भीतीपोटी ते गाव आणि आजूबाजूच्या ८५ गावांनी बैठक बोलावली आणि ते सर्व एका रात्रीतून अचानक निघून गेले. गाव खाली करुन निघायचे होते, त्यामुळे साहाजिकच सगळेजण आपापलं सर्व सामान घेऊन इथून निघून गेले असावेत. पण, असे न होता सगळे आपले सामान, रोजच्या वस्तू, अगदी खाण्यापिण्याचे सगळे सामान तिथेच टाकून घाईघाईने गाव सोडून निघून गेले.

गाव सोडताना त्यांनी या ठिकाणाला शाप दिला की या गावात पुन्हा कधीच गाव वसणार नाही आणि इतर कोणीही तेथे राहू शकणार नाही. त्यानंतर आजपर्यंत या गावात कोणीही राहू शकलेले नाही.

अनेक दशकांपासून ते तसेच पडीक आहे. दिवसा किंवा रात्री येथे जाताना एक विचित्र अस्वस्थता आणि भीती वाटत असल्याचा दावा लोकांनी केला आहे. काही लोकांचा असाही विश्वास आहे की सलीम सिंहने या गावावर इतका कर लादला होता की लोक तो भरू शकले नाहीत आणि दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. आता या गावाची देखभाल पुरातत्त्व सर्वेक्षण आणि सरकारकडून केली जाते.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.