जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 September 2024

‘ त्या ‘ निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल खमरोद्दीन यांचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

1 min read

बीड शहरातील बालेपीर भागात सध्या रस्ते व नालीचे काम चालू असून सदरिल बांधकाम हे 'कुचकामी' असल्याचे आरोप करत बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष महंमद खमरोद्दीन यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे . तसेच त्यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामांची कसून चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.

बीड: (प्रतिनिधी)- बालेपीर भागातील वैशिष्ठ्यपूर्ण कामासाठीच्या विशेष अनुदानातून करण्यात आलेल्या रस्ते व नाल्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर कामाची संबंधित विभागाकडून दखल न घेण्यात आल्याने बीड जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष महंमद खमरोद्दीन यांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला असून येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे दिला आहे. या बाबतीत खमरोद्दीन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बालेपीर येथील प्रभाग क्र.११ मधील रस्ता व नाली बांधकाम करणेसाठी शासन मार्फत निधी मंजूर करण्यात आला होता. सदर काम योग्य न करण्यात आल्याने सुरुवाती पासून होत असलेल्या रस्ते व नाली कामाच्या निकृष्ट दर्जाच्या कामा बाबत नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या निदर्शनास वेळो-वेळी आणून दिले. परंतु या विभागाच्या दुर्लक्षामुळे व ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सदर काम अंदाजपत्रकातील बाबी प्रमाणे रस्ता व नाली बांधकाम करण्यात आले नसल्यामुळे सदर निकृष्ट कामाची चौकशी करण्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करुन ही सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाची दखल घेण्यात न आल्याने सदर रस्ते व नाल्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करावी या मागणी करीता दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा गंभीर इशारा शहर अध्यक्ष महंमद खमरोद्दीन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.