जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

गॅस स्टेशनात स्फोट ३० जणांचा मृत्यू ; तर १०० हून अधिक जण गंभीर भाजले

1 min read

रशियातील दक्षिण भागातील दागेस्तान भागातील एका गॅस स्टेशनला लागलेल्या आगीत लहान मुलांसहीत ३० जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झालेले असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत.

मॉस्को: (वृत्तसंस्था)- गॅरेजमधील आग गॅस स्टेशन पर्यंत पोहोचली त्या नंतर झालेल्या स्फोटात लहान मुलांसहीत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १०० हून अधिक जण जखमी झालेले आहेत.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी माखचकालामध्ये एका महामार्गाजवळील गॅरेजमध्ये आग लागली. त्यानंतर स्फोटामुळे आग गॅस स्टेशनपर्यंत पोहोचली. ही घटना माखचकालामध्ये ग्लोबसम शॉपिंग सेंटरजवळ घडली आहे.

प्राथमिक माहितीनुसार गॅरेजमध्ये लागलेल्या आगीनंतर ही आग गॅस स्टेशनजवळ पोहोचली होती. त्यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री एका गॅरेजमध्ये आग लागली होती. त्यानंतर ती आग गॅस स्टेशनपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टसनुसार शोधकार्य आणि बचावकार्य सुरु आहे.

आपत्कालीन सेवांच्या कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य देखील सुरु करण्यात आले होते.
गॅस स्टेशनला आग लागून घडलेल्या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार १०५ जण जखमी झाले असून ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

बचावकार्य सुरु असल्याने मृतांची संख्या देखील वाढू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. गॅरेज आणि गॅस स्टेशनला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्राथमिक अहवालानुसार गॅस स्टेशनवरील आठ टँक पैकी दोन टँकचा स्फोट झाला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर, स्थानिक सरकारने एक दिवसाचा दुखवटा देखील जाहीर केला आहे. दरम्यान सुरुवातीला या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र, नंतर मिळालेल्या माहितीनुसार ३० जणांचा मृत्यू झाला असून १०५ जण जखमी झालेले आहेत. यातील बरेच जण भाजले असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना कशी घडली याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरु करण्यात आली असून दोषींवर कारवाई होणार का हे पाहावं लागेल.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.