जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 November 2024

महागाई वाढण्याचे काय आहे कारण ? किरकोळ तसेच घाऊक किंमतीत प्रचंड वाढ

1 min read

बीड सम्राट: या वर्षी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये महागाईचा दर ०.७४ टक्के इतका होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तोच दर ०.२६ टक्के होता. महागाई दर वाढण्याचे कारण अन्नधान्याच्या किंमतीत झालेली वाढ असल्याचे जाणवते .

घाऊक वस्तू किंमत निर्देशांक (WPI) गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर २०२३पर्यंत नकारात्मक होता. नोव्हेंबरमध्ये तो ०.२६ टक्के सकारात्मक झाला. डिसेंबरमध्‍ये अन्नधान्याच्या किंमती वाढून महागाई ९.३८ टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे, जी नोव्‍हेंबर २०२३ मध्‍ये ८.१८ टक्‍के होती.

याबरोबरच डिसेंबर २०२३ मध्ये घाऊक महागाईचा दर गेल्या ९ महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचला. डिसेंबर महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाईव्यतिरिक्त इंधन आणि वीज आणि उत्पादनांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे घाऊक महागाई दरात वाढ झाली आहे. प्राथमिक वस्तूंच्या घाऊक किंमतीतही वाढ झाली आहे.

डिसेंबर २०२३मध्ये खाद्यपदार्थांच्या घाऊक महागाईचा दर ४.६९ टक्क्या वरून ५.३९% इतका वाढला आहे.

डिसेंबर २०२३मध्ये पालेभाज्यांचा घाऊक महागाई दर २६.३० टक्के होता. याआधी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात हा आकडा १०.४४% होता.

डिसेंबर २०२३ मध्ये बटाट्याचा घाऊक महागाई दर -२४.०८% होता, जो नोव्हेंबर २०२३ मध्ये – २७.२२%होता.
नोव्हेंबर महिन्यात कांद्याचा घाऊक महागाई दर १९१.२४% होता. पण आता डिसेंबर २०२३मध्ये तो ९१.७७%वर आला.

याशिवाय डिसेंबर महिन्यात अंडी आणि मांसाचा घाऊक महागाई दर – ०.८४% ​​होता. नोव्हेंबर २०२३मध्ये तो १.४४%होता.
डिसेंबर २०२३मध्ये इंधन आणि उर्जेसाठी घाऊक महागाई दर मासिक आधारावर -२.४१% होता. तर नोव्हेंबर २०२३मध्ये तो – ४.६१% होता.

डिसेंबर २०२३ मध्ये उत्पादनांसाठी घाऊक महागाई दर -०.६४% पर्यंत घसरला. तर नोव्हेंबर २०२३ मध्ये तो -०.७१% होता.