जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

वाघा सोबत छेडखानी करणे पडले महागात

1 min read

व्हायरल बातमी: न्यजीव प्राण्यांत वाघ हा सर्वात खतरनाक प्राणी म्हणून ओळखला जातो. स्वतः जंगलांचा राजा सिंह सुद्धा वाघासोबत पंगा घेण्यापूर्वी चार वेळा विचार करतो. कारण वेळ पडली तर वाघ हत्तीला सुद्धा आडवा पाडू शकतो. अशा या खतरनाक प्राण्याशी चक्क एका तरुणीने पंगा घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे पिंजऱ्यात शिरून त्या वाघाला छेडत होती. पण तिचा तो स्पर्श वाघाला काही फारसा आवडला नाही. परिणामी त्याने तरुणीचा हात पकडला. मग कसेतरी वाघाला समजावून तिने आपला हात सोडवला. मात्र वाघ काही ऐकेना मग त्याने तिचा पाय पकडला. अन् शेवटी या तरुणीला चांगलीच मिठी मारली. पुढे या तरुणीसोबत काय घडले हे आता तुम्हीच earth.reel इन्स्टाग्रामवर पहा व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही सुद्धा शॉक व्हाल. वाघ हा अत्यंत निर्दयी शिकारी असल्याचे म्हटले जाते. कारण तो आधी आपल्या भक्ष्यासोबत खेळतो. त्याच्या डोळ्यांमध्ये मृत्यूची भिती पाहतो. अन् मग घाबरवून घाबरवून त्याचा जीव घेतो. असाच काहीसा प्रकार या तरुणीसोबत होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तर त्याचे झाले असे की, एक तरुणी वाघाच्या पिंजऱ्यात शिरून त्याच्यासोबत खेळत होती. खरं तर वाघ पाळीव आहे. म्हणूनच या वाघाच्या इतक्या जवळ जाता आले. पण जेंव्हा ती या वाघापासून दूर जाऊ लागली तेंव्हा तो खवळला. तिच्यावर विविध प्रकारे दबाव टाकू लागला. आधी त्यानं तिचा हात पकडला, मग पाय, मग तिच्या पाठीवर चढण्याचा प्रयत्न करू लागला. दरम्यान तरुणीने त्याला गोंजारून दूर होण्याचा प्रयत्न केला मात्र, फारसा काही फायदा झाली नाही. उलट वाघ आणखीनच आक्रमक झाला. या व्हिडीओमध्ये तरुणी प्रचंड घाबरलेली दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी ती कोणाला तरी इशारा करते की, या वाघापासून मला सोडावे. अर्थात तो वाघ पाळीव असल्यामुळे ती या वाघाच्या तावडीतून सुटल्याची शक्यता आहे. Earth.reel या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ७० हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. आता यापुढे ही तरुणी साधे वाघाचे चित्र पाहिले तरी सुद्धा नक्कीच घाबरेल.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.