थ्री इडियट्स चित्रपटातील प्रसंगाची वास्तविक जीवनात पुनरावृत्ती
1 min readपाटणा: स्त्री रोगतज्ज्ञ यांच्या सुचनेनुसार परिचारिकांनी केली असफल शस्त्रक्रिया
पाटणा येथे थ्री इडियट्स चित्रपटातील प्रसंगाची पुनरावृत्ती झाली मात्र गेला यात मालती देवी वय-२२ या गर्भवतीचा जीव. प्रसुती कळा सुरु झाल्यानंतर त्यांना पूर्णियातील लाईन बाजार परिसरातील समर्पण प्रसुतिगृहात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीं स्त्री रोगतज्ज्ञ सीमा कुमारी ह्या रुग्णालयात उपस्थित नव्हत्या. तरीही रुग्णालय प्रशासनानं महिलेलं शस्त्रक्रियेसाठी दाखल करुन घेतलं. गर्भवतीला तीव्र प्रसुती कळा सुरू झाल्याने परिचारिका आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांशी सल्लामसलत केली. त्यात प्रसुती करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.परिचारिकांनी मालती यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. शस्त्रक्रियेसाठी एका परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली. सीमा कुमारी व्हिडीओ कॉलवरुन परिचारिकेला सूचना देत होत्या. या सुचनांनुसार परिचारिका शस्त्रक्रिया करत असताना पोटातील एक महत्त्वाची नस कापली गेली. त्यात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असून सदरील महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. दोन्ही मुलांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या शाहणपना मुळे महिलेचा जीव गेल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात राडा सुरू केल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे.