पावसाळ्यात उद्भवणारे कानांचे आजार आणि काळजी
1 min read
-सध्या पावसाचे दिवस आहे आणि हे सर्वांनाच माहीत आहे की, पावसाळ्यातच वेगवेगळे आजारही होत असते. त्यातील एक मोठी समस्या म्हणजे कानात उद्भवणारे फंगल, बॅक्टेरिअल आणि व्हायरल इन्फेक्शन. पावसाचे दिवसात फंगल आणि बॅक्टेरिया सहजपणे वाढतात. अशात शरीराचे काही भाग जे पावसाळ्यात ओलाव्याचे असतात तिथे इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. शरीरातील असाच एक अवयव म्हणजे कान. कानात होणाऱ्या या समस्या बाबत जास्त लोकांना माहितही नसते.
कानात इन्फेक्शन होण्याची कारणे वेगवेगळी असू शकते. इन्फेक्शन कानाच्या वरच्या भागातही होते आणि कानाच्या आतही होते. यांतील काही कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील.
पावसात भिजल्याने – पावसात भिजण्याचे नुकसानही खूप आहेत. पावसात भिजल्याने कानात इन्फेक्शन हे व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होते. खासकरून बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया किंवा हिमोफिलस इनफ्लुएंजा. हे सामान्यपणे तुमच्या यूस्टेशियन ट्यूबच्या ब्लॉकेजमुळे होते. ज्यामुळे कानात एक द्रव्य तयार होते. यूस्टेशियन ट्यूब एक छोटी ट्यूब असते जी तुमच्या कानापासून थेट गळ्यापर्यंत जाते.
यात साबणाच्या पाण्यामुळे – पावसाळ्यात आधीच सगळीकडे ओलावा असतो. अशात साबणाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने कानात इन्फेक्शन सहजपणे होते.
तसेच स्वीमिंगमुळे – पावसाळ्यात स्वीमिंग पूलसारखी ठिकाणे फंगल आणि बॅक्टेरियासाठी प्रजननाची स्थळे असतात. अशात स्वीमिंग पूलच्या पाण्यामुळे तुम्हाला सहजपणे इन्फेक्शन होऊ शकते. या इन्फेक्शनमुळे कानात खाज आणि वेदना होऊ शकतात. याने नंतर समस्या वाढते. त्यामुळे पावसाळ्यात स्वीमिंग पूलमध्ये आंघोळ करणे टाळले पाहिजे.
पावसाळ्यात थंड पदार्थ खाल्ल्यामुळे – थंड पदार्थ खाल्ल्यामुळेही तुम्हाला कानात इन्फेक्शन होऊ शकते. हे संक्रमण एडीनोइडमधून कानात होते. तुमचे एडेनोइड तुमच्या नाकाच्या मागे तोंडाच्या आत वरच्या भागातील ग्रंथी आहेत. ज्या तुमच्या शरीराला संक्रमणापासून वाचवण्यास मदत करतात. संक्रमण या ग्रंथींमधून तुमच्या यूस्टेशियन ट्यूबच्या आजूबाजूला पसरू शकते. याने कानात इन्फेक्शन होतं.
यामुळे होणारे परिणाम कानात झोपताना वेदना होणे,झोप न लागणे,आवाज ऐकणे किंवा प्रतिक्रिया देण्याची समस्या,ताप,कानातून द्रव्य पदार्थ निघणे,डोकेदुखी या सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. या करीता पावसाळ्यात आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहेत.