जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

मी शाकाहारी असण्याचे कारण, माझे प्राणी प्रेम आहे- भाग्यश्री लिमये

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- भाग्यश्री लिमये ही मराठमोळी अभिनेत्री सध्या भाडिपा या यूट्यूब चॅनलवरील तिच्या सीरिजमुळे चर्चेत आहे. सध्या कांदे पोहे हा सीरीज मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरत असून सीरीज मधील प्रसिद्ध अभिनेत्री ही सोशल मीडियावर अतिशय ॲक्टिव्ह असून ती नेहमी तिचे अनेक फोटो – व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
अभिनेत्रीचे बालपण महाराष्ट्रातील सोलापुरात गेले. त्यानंतर अभिनय क्षेत्रात आल्यानंतर ती मुंबईत आली. मराठमोळ्या अभिनेत्रीला डान्सची अतिशय आवड असून शाळेत असतानाच तिने कथ्थकच्या तीन परीक्षा दिल्या होत्या.
आपलं करिअर करण्यासाठी सोलापुरातून मुंबईत आलेली अभिनेत्री भाग्यश्रीने एका मुलाखतीत ती नॉन-व्हेज खात नसल्याचे सांगितले. तसेच यामागे काय कारण आहे, ती पूर्ण शाकाहारी का आहे? हेदेखील तिने सांगितले आहे.
भाग्यश्रीने तिला प्राणी अतिशय आवडत असल्याचे सांगितले. प्राणी आवडत असल्यानेच नॉन-व्हेज खात नसल्याचे ती म्हणाली. भाग्यश्रीकडे तीन मांजरी आहेत. या मांजरींसोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
आपल्या मांजरींबद्दल सांगताना भाग्यश्रीने सांगितलं, ज्यावेळी मी शूटिंगला असते त्यावेळी या तीनही मांजरी घरात एकट्या असतात. शूटिंगसाठी १२-१२ तास बाहेर असताना त्या घरात एकट्याने राहत असल्याचे तिने सांगितलं. भाग्यश्री ही घाडगे अँड सून या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर ती बॉस माझी लाडाची या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. सध्या भाग्यश्री भाडिपा या यूट्यूब चॅनेलवरील कांदे पोहे सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहे.
भाग्यश्रीने तिच्या शाळेतील एक आठवणही सांगितली. इंग्रजी माध्यमात शिकूनही तिचे मराठी, शब्दांचे उच्चार चांगले आहेत. याबाबत बोलताना तिने सांगितले, मी इंग्रजी मीडियममध्ये शिकली असली तरी माझी आई सोलापूरच्या नूमवी शाळेची मुख्यध्यापिका होती. माझी शाळा झाल्यानंतर मी आईच्या शाळेत जायची. तिथेच मराठी भाषा, संस्कृत चांगलं झाल्याचं ती म्हणाली.