जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

तब्बल ६५० फूट खोल सिंकहोलमध्ये सापडली नवी दुनिया ; येथे वेगळीच रहस्यमयी जीवसृष्टी आहे

1 min read

बीजिंग: (वृत्तसंस्था)- या जगाच्या धरतीवर असे अनेक ठिकाणं आहेत जिथे माणूस पोहोचलेला नाही. पृथ्वीवरील अनेक गोष्टींपासून माणूस अनभिज्ञ आहे. अनेक रहस्यं अद्यापही उलगडलेली नाहीत. चीनमध्ये एक ६५० फूट खोल सिंकहोल सापडला आहे. या सिंकहोलमध्ये एक वेगळीच दुनियाचे अस्तित्व आहे.

या सिंकहोलचे फोटो पहिल्यांदाच जगा समोर आले आहेत. चीनमध्ये ६५० फूट खोल खड्डा सापडला आहे. या सिंकहोलमध्ये प्राचीन जंगल आढळले आहे. चिनी संशोधकांना ‘जियोपार्क’मध्ये भूमिगत रहस्य सापडले आहे.

या घटनेला चीनमध्ये तियानकेंग म्हटले जाते. हा सिंकहोल चीनच्या नैऋत्य भागातील गुआंग्शीमध्ये आहे. या भागात अनेक गुहा आहेत. जगातील सर्वात लांब नैसर्गिक पुलासाठी हा भाग ओळखला जातो.

सिंकहोलमध्ये संशोधकांना अनेक अज्ञात वनस्पती आणि प्राणी आढळले आहेत. चीनमध्ये असे ३० सिंकहोल आहेत.
सिंकहोलच्या खाली एक संरक्षित जंगल आहे. सिंकहोलची लांबी ३०६ मीटर, तर रुंदी १५० मीटर आहे. सिंकहोलमध्ये असलेली झाडे जवळपास ४० मीटर उंच आहेत.

सिंकहोल दिसायला एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे आहे. सिंकहोल आकाराने मोठा असल्याने त्याच्या आत सूर्यप्रकाश अगदी सहज जातो. त्यामुळे आत असलेली झाडे, वेली व्यवस्थित वाढतात.

संशोधक, शास्त्रज्ञांच्या दृष्टीने सिंकहोल अतिशय महत्त्वाचा आहे. त्यात अनेक रहस्यमय प्रजाती आढळण्याची शक्यता आहे. चिनी नागरिक अशा खड्ड्यांना दैवी मानतात.

चिनी भाषेत त्यांना तियांकेंग म्हटलं जातं. त्याचा अर्थ स्वर्गाचा खड्डा असा होतो. या ठिकाणी तीन अंतहीन गुफा आहेत. त्यातून सतत पाण्याचा प्रवाह सुरू असतो. या पाण्याचा स्रोत कोणता, याचं उत्तर कोणाकडेच नाही.

पाण्याचा प्रवाह अतिशय जास्त असल्याने उगमस्थान कोणालाच माहीत नाही.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.