जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

7 December 2024

अवघ्या वयाच्या १९ व्या वर्षी बनली सर्वात महागडी अभिनेत्री ; सुंबुल खान घेत आहे एका एपिसोडची इतकी फिस

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुंबुल तौकीर खान ही गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

सुंबुल तौकीर खान हिला खरी ओळख २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईमली’ या टिव्ही मालिकेतून मिळाली आहे. मुळाची मध्य प्रदेश राज्यातील असलेल्या सुंबुल तौकीर खान हिची समाजमाध्यमावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

सुंबुल तौकीर खान हिचा ईमली मालिकेतील लूक तिच्या चाहत्यांना आवडला होता. सुंबुल तौकीर खान हिने ईमली मालिकेनंतर लगेचच बिग बाॅस १६ मध्ये धमाल केली होती.

विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात सर्वात जास्त फिस घेणारी सदस्य ही सुंबुल तौकीर खान हिच होती.
बिग बाॅस १६ मध्ये सुंबुल तौकीर खान हे चर्चेत असलेले एक नाव होते. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात देखील सुंबुल तौकीर ही रिअल राहताना दिसली.

मंडलीमधील सदस्य ही सुंबुल तौकीर होती. साजिद खान तसेच बरंच कलाकारांसोबत सुंबुल या शोमध्ये सहभागी होती.सुंबुल तौकीर हिची बिग बाॅसच्या घरात खास मैत्री ही बघायला मिळाली.

सुंबुल तौकीर ही अवघ्या १९ वर्षांची आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी वयामध्ये सुंबुल तौकीर ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील आहे. सुंबुल तौकीर हिने काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. १७.२५ लाखांची कार देखील सुंबुल तौकीर हिने खरेदी केली आहे. वडिलांसोबत आणि बहिणींसोबत ही कार घेण्यासाठी सुंबुल तौकीर गेली होती.

रिपोर्टनुसार विशेष म्हणजे आता सुंबुल ताैकीर ही सर्वाधिक फिस घेणारी टीव्ही अभिनेत्री ठरली आहे. सुंबुल तौकीर ही लवकरच टीव्ही मालिका ‘काव्या’मध्ये दिसणार आहे.

विशेष म्हणजे या मालिकेतील भूमिकेसाठी तगडी फिस घेताना सुंबुल तौकीर ही दिसत आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी सुंबुल तौकीर ही तब्बल ७५- ८० फिस घेत आहे. म्हणजेच आठवड्यात १२ लाख फिस घेत असून यामुळे टिव्ही जगातील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून तीला ओळखले जाऊ लागले आहे.

सुंबुल तौकीर हिच्या पुनरागमनाची वाट तिचे चाहते हे बघताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सुंबुल तौकीर ही सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसत आहे.

पल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सुंबुल तौकीर ही दिसते. सुंबुल तौकीर हिचा काही दिवसांपूर्वी थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला होता.