जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

भारतातील एका रेल्वे स्थानकात जाण्यासाठी घ्यावा लागतो पाकिस्तानी व्हिसा

1 min read

भारतात पंजाब राज्यातील अमृतसर स्थित अटारी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिसाची आवश्यकता असते . २२ जुलै १९७६ साली समझौता एक्सप्रेस या नावाने दोन्ही देशांच्या दरम्यान ही रेल्वे सुविधा सुरू करण्यात आली होती . त्या करीता हे रेल्वे स्थानक निर्माण करण्यात आले होते . या रेल्वे स्थानकात विना व्हिसा फिरताना किंवा जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्यास फाॅरेनर्स ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. या रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पाकिस्तानची परवानगी घेणे आवश्यक आहे.

बीड सम्राट न्युज: भारत देशाने रेल्वेच्या बाबतीत खूप अत्याधुनिक प्रगती केली असून भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी रेल्वे लाईन आहे. भारतीय रेल्वे ही देशाची लाईफलाईन मानली जाते. तसेच भारतीय रेल्वे हे आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे आणि जगातील चौथे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील एकूण रेल्वे स्थानकांची संख्या सुमारे ८००० आहे. तुम्हाला कदाचित सर्व स्थानकांची नावे माहित नसतील. भारतीय रेल्वे खूप प्रगत आहे आणि देशातील रेल्वे आणि स्थानके अतिशय हायटेक झाली आहेत. सध्या भारतीय रेल्वे अनेक हायस्पीड ट्रेन चालवत आहे. भारतीय रेल्वेने दररोज सुमारे २.५० कोटी लोक प्रवास करतात, तर ३३ लाख टन मालाचीही देशभरात वाहतूक केली जाते. भारतीय रेल्वेची स्थापना ८ मे १८४५ रोजी झाली. भारतीय रेल्वेचे मुख्यालय राजधानी दिल्ली येथे आहे. १७८वर्षे जुनी भारतीय रेल्वे अजूनही सर्वात स्वस्त आणि पसंतीची वाहतूक साधन आहे.

पण तुम्हाला माहित आहे का की भारतात एक रेल्वे स्टेशन असे आहे, जिथे जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा आवश्यक आहे. वास्तविक, भारतीयांना या स्थानकावर जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिसाची आवश्यकता असते. तुम्ही येथे व्हिसाशिवाय जाऊ शकत नाही. अटारी असे या रेल्वे स्थानकाचे नाव आहे. देशातील हे एकमेव रेल्वे स्टेशन आहे, जिथे व्हिसा आवश्यक आहे. हे रेल्वे स्टेशन पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आहे आणि उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर रेल्वेच्या अखत्यारीत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की हे स्टेशन भारतात असतांनाही मग देशातील लोकांना येथे जाण्यासाठी पाकिस्तानचा व्हिसा का लागतो?

अटारी रेल्वे स्थानक हा भारताचा भाग आहे, परंतु येथे जाण्यासाठी पाकिस्तानची परवानगी का घ्यावी लागते? येथे फिरताना आढळल्यास तुरुंगात जावे लागू शकते. यासोबतच दंडही भरावा लागतो. या स्टेशनमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्यास फॉरेनर्स ॲक्टच्या कलम १४ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. असे घडले तर, दोषी सिद्ध होऊनही जामीन मिळणे फार कठीण होते आणि फौजदारी खटला चालवला जाऊ शकतो.

समझौता एक्स्प्रेस ही एकमेव आंतरराष्ट्रीय ट्रेन येथून धावत होती. तिने प्रवास करायचा असेल तर तिकीट खरेदी करण्यासाठी पासपोर्ट क्रमांक द्यावा लागतो. हे रेल्वे स्थानक फक्त समझौता एक्सप्रेससाठी खुले आहे. जर या ट्रेनला उशीर झाला, तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या रजिस्टरमध्ये नोंद केली जाते.

दिल्ली-अटारी एक्स्प्रेस, अमृतसर-अटारी डेमू, जबलपूर-अटारी स्पेशल ट्रेन देखील येथे दिसतील, परंतु त्यापैकी एकही अटारी-लाहोर मार्गावरून जात नाही. ही ट्रेन आठवड्यातून दोन वेळा बुधवारी आणि रविवारी प्रवाशांची वाहतूक लाहोरच्या दिशेने करतं . २२ जुलै १९७६ रोजी समझौता एक्सप्रेस ही ट्रेन दोन्ही देशांच्या दरम्यान सुरू करण्यात आली होती.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.