जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

संजय राऊत यांना येरवाड्यात दाखल करा- जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे

1 min read

बीड मध्ये शिवसेनेकडून संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन
जिल्हाप्रमुख खांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून जोरदार निषेध
——————————————————————————
बीड(प्रतिनिधी):-उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते संंजय राऊत यांनी सर्व प्रकारची मर्यादा सोडलेली दिसते. माध्यमांसमोर अर्वाच्च भाषेत आणि थुंकण्यासारखे गलिच्छ प्रकार करुन राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकिय संस्कृतीला काळीमा फासला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि खा.श्रीकांत शिंदे यांच्या विषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खा.संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकण्यासारखा गलिच्छ प्रकार केल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून शिवसेना बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या नेतृत्वाखाली राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.या येड्या संजय राऊतचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय,संजय राऊत यांना जेलमध्ये पाठवा,पुण्याच्या येरवाडा हॉस्पीटल मध्ये दाखल करुन त्यांचे डोके तपासा अशा प्रकारच्या घोषणा देत शिवसैनिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी नगरनाका चौकात खा.संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. संजय राऊत यांना आग्रा येथील मेंटल हॉस्पीटलमध्ये दाखल करा, राऊतांना अरबी समुद्रात बुडवा किंवा शिवसैनिकांच्या हवाली करा अशा घोषणा देवून राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या आंंंदोलन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे आणि शत्रुबद्दलही संयमाने वागण्या-बोलण्याची संस्कृती आहे. परंतु, खा. संजय राऊत या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम सातत्याने करत आहेत. अत्यंत शिवराळ आणि अर्वाच्य भाषा वापरणार्‍या राऊत यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना थुंकण्याचे कृत्य केले. त्यामुळे समस्त शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. राज्यातील जनतेकडूनही बोलघेवड्या आणि थुंकीबहाद्दर राऊतांचा निषेध केला जातोय. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांचाही त्यांनी अवमान केला आहे असे जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले.या आंदोलनात बीड बाजार समितीचे संचालक गणेश बाप्पा उगले, शहरप्रमुख कल्याण कवचट, बीड जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब मस्के बहिरवाडी विभाग प्रमुख रंजीत कदम, गोवर्धन काशीद, सरपंच रईस भाई शेख,उपसरपंच विकास घोडके, समीर बेग, माजी उपसरपंच पांडुरंग गवते, उपतालुकाप्रमुख देवराव आबा घोडके, विकास गवते, गणेश घोडके, राजाभाऊ नवले,भास्कर सानप, हनुमान जाधव, रमेश कानडे, रमेश शिंदे, नानासाहेब घल्लाळ, पप्पू शिंदे, सचिन जमदाडे, रमेश नवले, बापू नवले, रोहिदास गोरे, सुदर्शन मोरे, बाबू काशीद, प्रकाश काशीद, बंडू इंगळे,नवनाथ वांढरे, दीपक भांबे, विकास नगदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.