पंकजा मुंडे पक्ष सोडणार.?
1 min read
काँग्रेस पक्षाची दारे पंकजा मुंडे साठी उघडी- बाळासाहेब थोरात
—————————————————————————बीड-राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ आता काॅंग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंडे यांना पक्ष प्रवेशासाठी आमंत्रित केले आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त केली होती . प्रभाव झालेल्या काही नेत्यांना पक्षाने संधी दिली मात्र माझ्या सोबत योग्य तो न्याय केला नसल्याचे खंतही व्यक्त केल्या असल्यामुळे पंकजा मुंडे पक्षा बाहेर पडणार की काय .?या चर्चेला उधाण आले आहे. त्यात रा.काॅंग्रेस व काॅंग्रेस पक्षांच्या नेत्यां कडून येणाऱ्या ऑफर्स मुळे मुंडे पक्ष सोडतील की काय.? या चर्चेला अधिक रंगत आली आहे.
मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या सोबत ठामपणे उभे असल्याचे दिसते . उभ्या महाराष्ट्रात पक्षाची वेल रुजविण्यात स्व.मुंडे यांचा मोलाचा वाटा आहे . स्व.मुंडे यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची पक्ष श्रेष्ठींना विसर पडला असल्याचे भावना ही सर्वसामान्य कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. त्यांतच भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मुंडे यांना दिलेल्या ऑफर बद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की पंकजा मुंडे यांचे मला माहित नाही.? मात्र काॅंग्रेसने दार उघडल्याने काॅंग्रेस मधलं काही नेते बाहेर पडतील एवढं मात्र खरं आहे. असा टोला ही मुनगंटीवार यांनी मारला आहे.पंकजा मुंडे पक्ष सोडतील किंवा नाही. एवढे मात्र खरे आहे त्यांचे निर्णयाचा सर्वसामान्यात नक्कीच स्वागत होईल असे चित्र दिसत आहेत.