जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

प्रसिद्ध अभिनेत्री ते यशस्वी उद्योजिका- डिंपल कपाडिया

1 min read

मुंबई : ८ जून हा प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म दिवस आहे. आज त्यांचा ६५ वा वाढदिवस असून डिंपल यांचा जन्म ८ जून १९५७ रोजी एका गुजराती कुटुंबात झाला होता. कपाडिया ह्या एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या आहेत. त्यांचे वडील त्या काळातील यशस्वी उद्योजक होते. डिंपल यांना अभिनय क्षेत्रात आणण्याचं श्रेय राज कपूर यांना जाते. वडील चुन्नीभाई हे आपल्या घरी पार्टी द्यायचे .त्या पार्टीत अनेक कलाकार तिथं यायचे. राज कपूरही तिथं आले होते. तेव्हा त्यांनी डिंपल यांना पाहिलं. वयाच्या १३ व्या वर्षी डिंपल यांना घेऊन राज कपूर यांनी बॉबी चित्रपट बनवला. त्या चित्रपटातून डिंपल आणि ऋषी कपूर यांनी सिनेमाविश्वात प्रवेश केला. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले. या मायावी बॉलिवूड जगात अनेक अभिनेत्रींनी काम केलं. यश देखील मिळवलं. परंतु डिंपल यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटात काम करून एका रात्रीतून प्रसिद्धी कमावली . केवळ एवढेच नव्हे तर पहिला चित्रपट यशस्वी झाल्यानंतर डिंपल यांनी त्याकाळातले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं आणि झगमगत्या विश्वापासून दूर देखील गेल्या.
खन्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर राजेश यांच्या सांगण्यावरून डिंपल यांनी अभिनयातून ब्रेक घेतला होता व मनोरंजन जगापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र राजेश खन्ना सोबत केलेलं लग्न फार काळ टिकलं नाही.राजेश खन्ना आणि डिंपल यांच्यात दुरावा निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरल्या टीना . सांगितलं जातं. टीना आणि राजेश चित्रपट निर्मिती कामांसाठी सतत बाहेर असायचे. त्यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. ही गोष्ट डिंपल यांना कळली आणि राजेश यांचे घर सोडले.त्यावेळी त्यांच्या लग्नाला ११ वर्षे झाली होती. दोघांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. परंतु ते नंतर कधीही एकत्र आले नाहीत.राजेश यांच्यापासून दूर गेल्यानंतर डिंपल यांनी पुन्हा अभिनयाच्या विश्वात पुनरागमन केलं. परंतु त्यावेळी त्यांना श्रीदेवीशी तगडी स्पर्धा करावी लागली तरीही डिंपल यांनी हार मानली नाही. डिंपल यांनी ‘सागर’, ‘जांबाज’, ‘कब्जा’, ‘रामलखन’, ‘खून का कर्ज’, ‘अजूबा’, ‘रुदाली’, ‘क्रांतिवीर’, ‘मृत्युदाता’, ‘दबंग’ आणि ‘कॉकटेल’ या सिनेमांत काम करत त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली.
डिंपल कपाडिया या यशस्वी उद्योजिका देखील आहेत. त्यांचा होममेड डिझायनर्स कँडल तयार करण्याचा उद्योग आहे. Far Away Tree या नावाची एक कंपनी देखील आहे. या मेणबत्त्या सुगंधी आहेत. डिंपल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ‘मला मेणबत्त्या बनवण्याची खूप आवड आहे. जेव्हा जेव्हा मी परदेशात जाते तेव्हा मी तिथून भरपूर मेणबत्त्या विकत आणते.’ डिंपल यांनी परदेशात जाऊन मेणबत्त्या तयार करण्याचा खास प्रशिक्षण ही घेतले असल्याचे समजते. डिंपल यांच्या कामाबद्दल सांगायचं तर अलिकडेच त्या ब्रह्मास्त्र, आणि पठाण सिनेमात दिसल्या आहेत. या शिवाय सास बहू और फ्लेमिंगो या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.