जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

शरद पवारांना धमकी देणाऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल.

1 min read

मुंबई : (वृत्त संस्था)सध्या समाजमाध्यमाद्वारे कोणालाही काही म्हणण्याची विकृत मानसिकता तयार झाल्याचे दिसून येते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना समाजमाध्यमावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई येथील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात संबंधितांना विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेला सोपविण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही आरोपी विरूद्ध लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. एका ट्विटर हँडलवरून आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांच्याविषयी भाष्य करण्यात आले आहे. यापैकी फेसबुकवरील नर्मदाबाई पटवर्धन नावाच्या पेजवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून, ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार,’ अशी धमकी देण्यात आली होती. तर, सौरभ पिंपळकर या ट्विटर हँडलवरून शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा असलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या दोन्ही प्रकरणांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून यासाठी सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात आहे.
तसेच शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनाही फोनद्वारे धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे . राऊत यांनी फोन न घेतल्याने त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन करून धमकावण्यात आले. या प्रकरणातही पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे समजते. दरम्यान समाजमाध्यमाद्वारे समाजामध्ये कोणाला काही ही म्हण्याचे प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. जिथल्या – तिथल्या स्थानिक प्रशासनाने सदरील बाबतीत गंभीर दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.