जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केल्या उर्दू शाळांना पाच सुट्ट्या

1 min read

बीड: (प्रतिनिधी)- चालू वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये उर्दू माध्यमांच्या शाळांना पाच सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. बकरी ईदच्या दुसर्‍या दिवशी दि.३०जुन २०२३ रोजी देखील सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजेद अहेमद यांच्या मागणीला आणि पाठपुराव्याला या निर्णयामुळे यश आले आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी आणि माध्यमिकचे नागनाथ शिंदे यांनी दि.२०जुन रोजी या बाबतचे आदेश काढले असून शैक्षणिक वर्ष २०२३-२४करीता उर्दू माध्यमांच्या शाळांना पाच सुट्ट्या जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरील मंजुर सुट्ट्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील पाच दिवस सुट्ट्या कमी करण्यात येतील. या बाबत स्वतंत्र पत्रक काढण्यात येईल किंवा दिवाळी सुट्टीच्या परिपत्रकात नमुद करण्यात येईल. त्याचबरोबर पवित्र रमजान महिन्यात उर्दू शाळांची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० पर्यंत राहिल. तसेच दुबार/शिफ्ट पध्दतीने सुरू असलेल्या शाळांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. उर्दू शाळांच्या सुट्ट्यांमध्ये चंद्रदर्शनानुसार बदल करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे या आदेशात नमुद करण्यात आले आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्या खाली नमूद केल्याप्रमाणे आहे. बकरी ईद (दुसरा दिन) दि.३० जून २०२३, शबे मेराज दि.७ फेब्रुवारी २०२४, जुमातुल विदा दि.५ एप्रिल २०२४ आणि रमजान ईद (दुसरा व तिसरा दिवस) दि.११, दि.१२एप्रिल २०२४-दोन दिवस अशा पाच सुट्ट्यांचा समावेश शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयात आहेत.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.