जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

स्व.विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे

1 min read

बीड: (प्रतिनिधी) स्व.विनायकराव मेटे यांच्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहेत.
शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील चक्रधर नगर, पोस्ट मन काॅलोनी,विश्व नगर,भद्रा मारुती नगर, शिंदे नगर आदि ठिकाणी अभियान राबविण्यात येत आहे. या वेळी शिवसंग्राम संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे तसेच सरचिटणीस सुहास पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषाताई कुपकर, शहराध्यक्ष राहुल मस्के, मुकुंद गोरे, ज्ञानेश्वर कोकाटे, कैलास शेजाळ, हरिश्चंद्र ठोसर, माजी सभापती मनीषाताई कोकाटे, साधनाताई दातखीळ, महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष संगीता ताई ठोसर, शारदाताई बेद्रे आदि उपस्थित होते.