जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

छत्र्या विकताना दिसला सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेता

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- नेहमी प्रेक्षकांना हसवणारा प्रचंड लोकप्रिय विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हर सध्या चर्चेत आलाय. ‘द कपिल शर्मा शो’ मुळे तो घराघरांत पोहोचला. त्याने कॉमेडीच्या विश्वात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुनील सध्या त्याच्या शोमुळे नव्हें तर एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. सुनील समाजमाध्यमावरही प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकताच शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. एका व्हिडिओत सुनील एका गाड्यावर चक्क मक्याचे कणीस भाजताना, मका शिजवताना दिसतोय. सुनीलने शेअर केलेल्या या व्हिडिओत बॅकग्राउंडला ‘मिशन इम्पॉसिबल’ चे म्युझिक वाजत असून सुनीलने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, पुढच्या मिशनच्या शोधात आहे.. इतकंच नाही तर, सुनीलने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओत तो छत्री विकताना दिसतो.हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिलंय की, इतका पाऊस आहे की, माझी छत्रीही विकावी लागली.

यावर काही नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, सर काय अवस्था करून घेतली आहे तुम्ही. तर काही जणांनी नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्नही त्याला विचारला आहे. असे काही करण्याची सुनीलची ही पहिली वेळ नाही. याआधीही असेच काही अतरंगी गोष्टी विकतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. याआधी सुनीलने ऊसाचा रस, छोले कुल्चे विकतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तर कधी सुनील उत्तराखंडमध्ये चहाच्या टपरीवर चहा पिताना आणि विकताना दिसला होता. तर कधी रस्त्याच्याकडेला बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर दिसला होता. सुनीलच्या चाहत्यांना त्याचे हे अंदाज खूप आवडले आहे. दरम्यान, आज यशाच्या शिखरावर असणाऱ्या सुनीलचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. हरयाणामधील डबवाली गावात त्याचा जन्म झाला, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण त्याने तिथेच पूर्ण केले. पंजाब विद्यापीठातून त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतले असून अभिनयक्षेत्रात नाव कमावण्यासाठी तो मुंबईत येऊन पोहोचला होता. एका मुलाखतीत सुनीलने सांगितले होते की मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला त्याच्याकडे नोकरी नव्हती. पैसे कमावण्यासाठी त्याला बरेच कष्ट घ्यावे लागले. कालांतराने एक नोकरी मिळाली ज्यात पगार ५०० रुपये होता. त्याने बँकेतही काम केले. यानंतर त्याला रेडिओमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तो सिनेसृष्टीत येवून एका लोकप्रिय विनोदी अभिनेता च्या रुपात जगा समोर आपले अभिनय सादर करीत आहेत.