जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

मोहरमच्या मिरवणुकीमध्ये विद्युत शॉक लागून चार जणांचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी

1 min read

झारखंडराज्यातील बोकारो जिल्ह्यात आज मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान ताजिया उचलताना हायटेंशन वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीररित्या भाजले आहेत.

रांची: (वृत्तसंस्था)- आज सकाळी झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. हायटेंशन वायरच्या संपर्कात आल्याने १३ जण होरपळले. यातील चौघांचा मृत्यू झाला असून अन्य ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बोकारोच्या बेरमो परिसरातील खेतकोमध्ये सकाळी मोहरमची मिरवणूक निघाली. ताजिया घेऊन जात असताना विजेच्या तारेला स्पर्श झाला. त्या तारेतून ११००० वोल्टचा वीज प्रवाह जात होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ताजिया उचलताच त्याचा स्पर्श हायटेंशन वायरला झाला. त्यामुळे ताजियामधील बॅटरीचा स्फोट झाला. ताजियाचा संपर्क विजेच्या तारेशी येताच १३ जण गंभीररित्या भाजले. त्यातील चौघांचा मृत्यू झाला. तर अन्य ९ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना डीव्हीसी बोकारो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातून वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमींच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. प्रथमोपचारानंतर जखमींना बोकारोला पाठवण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे .

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.