जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 November 2024

रेल्वेच्या प्रवासात हरवले किंवा चोरीला गेलेल्या वस्तूंची जबाबदारी स्वतः प्रवाशांची- सर्वोच्च न्यायालय

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था) रेल्वे हा प्रवासाचा महत्त्वपूर्ण साधन असुन देशातील लोकांच्या वाहतुकीची जबाबदारी खंबीरपणे निभावते. भारतीय रेल्वेने दररोज करोडो प्रवासी प्रवास करतात. यातील अनेकजण सुट्टीच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात जाणारे, तर अनेकांचे घर ते ऑफिस चे प्रवास रेल्वेने पूर्ण होतो. तुम्हीही भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर आता पुढच्या वेळी तुम्ही रेल्वेने प्रवास करत असल्यास तर त्याआधी तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच आलेला निर्णय माहित असणे आवश्यक आहे. रेल्वेत
तुम्हीही कधी ना कधी प्रवास केला असेलच. इथे बहुतेक प्रवासी त्यांचे सामान सीटखाली ठेवतात, पण आता तुमच्यासाठी हे जाणून घेणे आवश्यक आहे की, ट्रेनमधून प्रवास करताना जर तुमचे सामान चोरीला गेले किंवा हरवले तर त्याला रेल्वे नव्हें तर तुम्ही स्वतः जबाबदार असाल. रेल्वेने प्रवास करताना तुम्ही ही घोषणा अनेकदा ऐकली असेल.. ‘प्रवाशांनी कृपया लक्ष द्या.. प्रवाशांनी त्यांचे सामान स्वतः सुरक्षित ठेवावे’. PTI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आता सर्वोच्च न्यायालयानेही या घोषणेला मान्यता दिली आहे. प्रवासादरम्यान तुमचे कोणतेही सामान हरवले किंवा चोरीला गेले तर त्याला रेल्वे जबाबदार राहणार नाही आणि ती रेल्वेच्या सेवेतील कमतरता मानता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे.राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या (NCDRC) निर्णयाविरोधात याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीतील खंडपीठात सुनावणी सुरू होती. संबंधित प्रकरणात एका व्यावसायिकाचे सामान हरवले होते. रेल्वेने प्रवास करताना कमरेच्या पट्ट्यात ठेवलेले एक लाख रुपये हरवल्याचा दावा या व्यावसायिकाने जिल्हा ग्राहक मंचासमोर केला आणि रेल्वेकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. NCDRC ने रेल्वेला एका व्यावसायिकाला एक लाख रुपये देण्याचे निर्देश दिले मात्र न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या सुट्टीतील खंडपीठाने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचा आदेश रद्द केला आणि रेल्वे प्रवासादरम्यान एखाद्याचे सामान चोरीला गेल्याने रेल्वेच्या सेवेत कमतरता आहे असे म्हणता येणार नाही, असे खंडपीठाने म्हंटले आहे. प्रवासी स्वतःच्या सामानाचे संरक्षण करू शकत नसल्यास रेल्वेला जबाबदार धरता येणार नाही.