जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

21 October 2025

मुंबईतील चेंबूर येथे एकाच परिवारातील ७ जणांचा होरपळून मृत्यू ; शाॅर्ट सर्किटमुळे आग लागण्याच्या अंदाज

1 min read

मुंबई:( वृत्तसंस्था) मुंबई येथील चेंबूर भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सिद्धार्थनगर येथे एका घराला भीषण आग लागली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चेंबूर येथे सिद्धार्थनगर येथील घराला आज पहाटे साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. यावेळी घरातील सर्व सदस्य निद्रावस्थेत होते.

गुप्ता परिवारातील सर्व सदस्य असून त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाला सांगण्यात आले होते. मात्र, अग्नीशमन दलाचे पथक येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले त्यातच गुप्ता कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता परिवाराला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. मृतांमध्ये तीन लहान मुले आणि दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. आग लागल्यानंतर सगळे घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आगीने रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता आले नाही. तसेच, सर्व कुटुंब साखरझोपेत असातानाच आग लागली त्यामुळे त्यांना बाहेर पडणे कठिण झाले.

सदरील परिवार हा राहात असलेले घर हे दोन मजली आहे.

गुप्ता परिवार राहात असलेले घर हे दोन मजली होते. तळ मजल्याला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग भडकली असावी. तसेच सर्वजण झोपेत असल्यामुळे उशीर झाला व आगीने रौद्ररुप धारण केले.

स्थानिकांनीही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. सध्या अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.