जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

14 November 2025

रतन टाटांनी ब्रिटनचा जीवनगौरव पुरस्कार नाकारला.

1 min read

मुंबई : (वृत्तसंस्था)भारतीय उद्योग जगातील सम्राट. रतन टाटा हे फक्त एक दिग्गज उद्योगपती नाही तर अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत. रतन टाटा यांनी टाटा समूहाला नव्या शिखरावर नेऊन पोहचवलाच पण समाजकार्यात सुद्धा मोठं योगदान दिले असून आजही देत आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एमेरिटस रतन टाटा यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती आणि स्तंभलेखक सुहेल सेठ यांनी टाटां विषयी काही वर्षांपूर्वी घडलेला व टाटांच्या जीवनाशी संबंधित असलेला एक किस्सा शेअर केला असून त्यात म्हटले आहे की
६ फेब्रुवारी २०१८ रोजी ब्रिटनचा शाही राजवाडा, बकिंगहॅम पॅलेस येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ब्रिटनचे तत्कालीन प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना त्यांच्या परोपकारी कार्यांसाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते . पण रतन टाटा त्या कार्यक्रमाला हजेरी लावू शकले नाही आणि त्या मागचे कारण त्यांचा कुत्रा होता, हे ऐकून लोक आश्चर्यचकीत झाले .सुहेल यांनी सांगितले की, जेंव्हा ते विमान प्रवासाने लंडन विमानतळावर उतरले तेंव्हा त्यांच्या फोनवर रतन टाटांचे ११ मिस्डकॉल नोटिफिकेशन्स आल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. सुहेलने सांगितले की इतके मिस्डकॉल पाहून ते थोडेसे आश्चर्यचकित झाले आणि विमानतळावरून बॅग उचलल्यानंतर लगेच त्यांनी टाटांना फोन लावला. रतन टाटां सोबत झालेल्या संवादाची आठवण काढताना सुहेल यांनी सांगितले की, “त्यांचा एक कुत्रा – टँगो आणि टिटो – खूप आजारी पडले होते. त्यांनी दोघांपैकी नेमके कोणाचे नाव घेतले ते मला आठवत नाही, पण टँगो आणि टिटोपैकी एक गंभीरपणे आजारी होता. टाटा यांनी मला सांगितले की तो आजारी आहे आणि मी त्याला सोडून कार्यक्रमात येऊ शकत नाही.” हे ऐकून सुहेलला आश्चर्य वाटले आणि प्रिन्स चार्ल्सचे नाव सांगून टाटा समूहाच्या अध्यक्षांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात मला यश मिळाले नाही. शेवटी रतन टाटा पुरस्कार घेण्यासाठी त्या कार्यक्रमाला आले नव्हते.सुहेल सेठ यांनी रतन टाटा या कार्यक्रमात न येण्यामागचे कारण सांगितल्यावर तत्कालीन प्रिन्स चार्ल्सने काय प्रतिक्रिया दिली याबद्दल सांगितले. प्रिन्स चार्ल्स असे म्हणाले की “माणूस असाच असावा. रतन टाटा एक अद्भुत व्यक्ती आहे.”