जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

22 October 2025

समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अपघातात सतरा ठार मुख्यमंत्र्यांनी केली प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- मध्यरात्रीच्या सुमारास शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर क्रेन कोसळल्याने १७ लोकांचं जीव गेले आहे. या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करुन या दुर्घटनेत आत्तापर्यंत १७ जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले आहे. एनडीआरएफचे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार सरलांबे या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे. ही घटना रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरून मजुरांवर कोसळला. सुरक्षेबाबत कोणतीही उपययोजना नसल्याने १७ मजुरांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशन दल आणि एनडीआरफच्या पथकाकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहेत.