जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

कृषी उपयुक्त पॉवर टिलर पॉवर वीडर या यंत्रांची तात्काळ लाॅटरी काढा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल – बापूसाहेब साळुंके

1 min read

बीड: (प्रतिनिधी)- राज्यस्तरावर कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जात आहे यामध्ये शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर शेती अवजारे लॉटरी पद्धतीने दिले जात आहेत या पहिल्या टप्प्यात पावर टिलर पावर विडर या दोन यंत्राचे लॉटरी निघणार आहे दोन्ही यंत्राचा उपयोग मराठवाड्यात केला जात असून पावर टिलर पावर विडर या यंत्राची मागणी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये मराठवाडा विभागासाठी पावर टिलर पावर विडर या यंत्राची लॉटरी पहिल्या टप्प्यात काढण्यात यावी जुलै महिन्यापर्यंत ही लॉटरी न काढल्यास अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंके व शहराध्यक्ष दत्ता शेळके यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की मराठवाड्यात कापूस हे प्रमुख पीक असून त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते तसेच सोयाबीन या पिकातील अंतर्गत मशागतीसाठी या यंत्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो . पॉवर टिलर व पावर विडर हा यंत्र शेतक-यांसाठी खूप महत्त्वाचे असल्यामुळे शेतकऱ्यांत त्या यंत्राची मोठ्या प्रमाणात मागणी आहे दोन्ही यंत्राचा वापर राज्यात इतर भागातही केला जातो मात्र बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केला जात असून कृषी यंत्र न मिळाल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे त्यामुळे या यंत्राचे वितरण पहिल्या टप्प्यात करण्यात यावा. अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ बीड जिल्हाच्या वतीने करण्यात आली आहेत.‌

You may have missed

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.